सोनीने भारतात लाँच केले दोन पॉवरबँक्स, किंमत ५१०० रुपये आणि ७५०० रुपये
सोनीच्या 15000mAh आणि 20000mAh पॉवरबँकची किंमत ५१०० रुपये आणि ७५०० रुपये आहे.
सोनीने भारतीय बाजारात दोन नवीन पॉवरबँक लाँच केले. ह्यात एक 15000mAh आणि दुसरा 20000mAh क्षमतेचा आहे. सोनीच्या 15000mAh आणि 20000mAh पॉवरबँकची किंमत अनुक्रमे ५१०० रुपये आणि ७५०० रुपये आहे. हा ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्याचबरोबर ह्याला सोनी सेंटर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक स्टोर्समधून खरेदी करु शकता.
हे दोन्ही पॉवर बँक अनेक डिवायसेसला चार्ज करु शकतात. हा पास-थ्रू चार्जिंगसह येतो. ह्याचाच अर्थ असा की, पॉवर बँक चार्ज करत असतानाही आपण आपला स्मार्टफोन किंवा इतर कोणताही डिवाइस ह्याने चार्ज करु शकतात.
हेदेखील पाहा – HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
हा पॉवर बँक १५ जुलैपासून ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर आणि १५ ऑगस्टपासून सोनी सेंटर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट
हेदेखील वाचा – आयडियाने भारतात केली मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट