Sony Mobile Projector भारतात लॉन्च, 5,000mAh ची बॅटरी आहे यात
Sony ने भारतात आपला Sony MP-CD1 मोबाईल प्रोजेक्टर लॉन्च केला आहे, हा प्रोजेक्टर भारतात 3 ऑगस्ट 2018 पासून उपलब्ध होणार आहे.
Sony Launched Ultra-Portable Mobile Projector in India with 5000mAh in-Build Battery: Sony ने भारतात आपला Sony MP-CD1 मोबाईल प्रोजेक्टर लॉन्च केला आहे. या डिवाइस च्या डायमेंशन इत्यादी पाहता हा डिवाइस हुबेहुब Sony Xperia स्मार्टफोंस सारखाच आहे. हा सहज सोबत कॅरी करता येईल, तसेच याला हँडल करने पण सोप्पे आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा 304.8 cm साइज वाल्या गोष्टी जवळपास 350cm दूरवरून प्रोजेक्ट करू शकतो.
Sony चा हा नवीन डिवाइस म्हणजे Sony MP-CD1 फक्त 280 ग्राम चा आहे, तसेच हा कोणत्याही सरफेसला एका वाइड स्क्रीन बनवू शकतो. सोनी che म्हणेन आहे की या प्रोजेक्टर च्या माध्यामातून तुम्ही अनेक लोकां पर्यंत कंटेंट प्रोजेक्ट करू शकता. या डिवाइस मध्ये MP-CD1 टेक्सास इंस्ट्रुमेंटल DLP intelliBright टेक्नॉलजी आहे, ज्यामुळे हा डिवाइस ब्राइटनेस आणि पॉवर कंजम्पशन मॅनेज करतो. याची ब्राइटनेस रेटिंग 105 ANSI लुमेंस आहे. तसेच हा बॅटरी वर काही लोड न देता हा ब्राइटनेस वाढवू शकतो.
या डिवाइस मध्ये तुम्हाला एक इन-बिल्ड 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. त्यामुळे तुम्ही विना दिक्कत 2 तास नॉन-स्टॉप वापरू शकता. हा डिवाइस म्हणजे Sony MP-CD1 मोबाईल प्रोजेक्टर आटोमेटिक कीस्टोन करेक्शन टेक्नोलॉजी सह येतो, त्यामुळे तुम्ही सहज फुल-स्क्रीन डिस्प्ले प्रोजेक्ट करू शकता.
या प्रोजेक्टर मध्ये तुम्हाला स्टॅण्डर्ड ट्रायपोड सॉकेट पण मिळेल, तसेच यात एक फॅन पण आहे, जो याला थंड ठेवतो. कनेक्टिविटी साठी यात तुम्हाला HDMI आणि USB पोर्ट्स देण्यात आले आहेत. ज्याच्या माध्यामातून तुम्ही अनेक प्रकारच्या मीडिया स्ट्रीमिंग डिवाइसेज चा वापर करू शकता. म्हणजे तुम्ही या सोबत लॅपटॉप जोडू शकता, तसेच गेमिंग कंसोल पण जोडू शकता. हा पाच सेकंडस मध्ये वापर करण्यासाठी तयार होतो आणि तुमच्या PC सोबत HDMI ने जोडला जाऊ शकतो.
या डिवाइस चा वापर पॉवर बँक म्हणून पण करता येईल, याची किंमत पाहता हा जवळपास Rs 29,990 मध्ये मिळत आहे. हा अल्ट्रा-पोर्टेबल मोबाईल प्रोजेक्टर तुम्ही 3 ऑगस्ट 2018 पासून विकत घेऊ शकता.