सोनीने आपल्या A6000 चा पुढील जेनचा कॅमेरा A6300 मिररलेस कॅमेरा लाँच केला आहे. ह्या कॅमे-याची किंमत ७४,९९० रुपये ठरविण्यात आली आहे. ह्या किंमतीत आपल्याला 16-50mm, f/3.5-f/5.6 लेन्ससुद्धा मिळत आहे, जी जवळ १,१५० डॉलर आहे.
ह्या कॅमे-यामध्ये आपल्याला 24.2 मेगापिक्सेलचा सेंसर सोनीच्या 4D AF सिस्टमसह मिळत आहे. तसेच ह्यात A6000 प्रमाणे Bionz X इमेज प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्याची नेटिव रेंज 100-25600 आहे आणि कॅमेरा पुर्ण मॅग्नेशियम अलॉय बॉडीसह दिला आहे, जो धूळीपासून संरक्षित करण्यात आलेला आहे.
मात्र ह्याच्या स्क्रीनमध्ये काही विशेष बदल केले गेले नाही. ह्याचाच अर्थ ह्यातसुद्धा 3 इंचाची LCD डिस्प्ले दिली गेली आहे, जी टचस्क्रीन नाही.
हेदेखील वाचा – 2.5D कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतात भारतातील हे आकर्षक स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – फ्लिपकार्ट सॅमसंग वीक: सॅमसंगच्या फोन्सवर मिळतोय आकर्षक डिस्काउंट