स्नॅपचॅट वन हँड झूम फीचरसह झाला अपडेट

स्नॅपचॅट वन हँड झूम फीचरसह झाला अपडेट
HIGHLIGHTS

स्नॅपचॅटमध्ये यूजर्स आता फोटो काढत असताना एका हाताने फोटो झूमही करु शकणार.

प्रसिद्ध असलेल्या फोटोज आणि व्हिडियो मेसेजिंग अॅप स्नॅपचॅट एक नवीन अपडेट सह लाँच झाला आहे. आपल्या नवीन अपडेटमध्ये अॅपने एक नवीन फीचर जोडलेले आहे, ज्यात आपल्याला फोटो काढत असताना कॅप्चर बटन सुद्धा टच न करता कॅमेरेच्या माध्यमातून डायरेक्ट झूम करु शकाल.
 

ह्याच्या पहिल्या व्हर्जनमध्ये फोटो काढताना दोन्ही हातांचा वापर केला जात होता. एक हात कॅप्चर बटनच्या वर आणि दुसरे झूम करण्यासाठी वापरले जात होते. मात्र आता आपण ह्या कॅमे-याच्या माध्यमातून एका हाताने फोटो झूम करु शकाल. त्यासाठी यूजर्सला स्नॅपचॅटच्या नवीन व्हर्जनला अपडेट करावे लागेल. ज्याच्या बरोबर अपडेट झालेल्या व्हर्जनमध्ये नवीन फिचर जोडले जाईल. सध्यातरी स्नॅपचॅटचे १०० मिलियनपेक्षाही जास्त यूजर्स आहेत.

काय आहे हे स्नॅपचॅट?
स्नॅपचॅट एक फन मेसेजिंग अॅप आहे ज्याच्या माध्यमातून आपण फोटोंची योग्यरित्या मांडणी करु शकता. ह्यात फोटोज आणि व्हिडियोज सुद्धा बनवू शकता आणि त्याचबरोबर आपण ह्याला आपल्या मित्रांना किंवा कोणत्या ग्रुपमध्ये दिलेल्या कॅप्शनसह शेअर करु शकता. ज्यानंतर तुमचे मित्र ह्याला १० सेकंदापर्यंत पाहू शकतील आणि जे नंतर आपोआप गायब होईल.

हेदेखील वाचा – १२ मे ला होणार LeEco Le 1S Eco स्मार्टफोनचा फ्लॅश सेल, किंमत ९,९९९ रुपये
हेदेखील वाचा – लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo