Smartron ही अलीकडेच भारतात स्वत:ला स्थापित एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. त्याशिवाय दुस-या एका कंपनीविषयी बोलायचे झाले तर, काही काळापुर्वी Creo ने आपला Creo mark 1 लाँच केला होता. हा फ्यूल ओएसवर चालतो. Creo ही सॉफ्टवेअरवर जास्त लक्ष देते तर Smartron इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींवर लक्ष देते.
ह्या कंपनीने आपला tBook टॅबलेट लाँच केला आहे. कंपनीने विंडोज 10 सह हा टॅबलेट लाँच केलाय. ह्याला मॅग्नेशियम+अॅल्युमिनियम बॉडीसह निर्मित केला गेला आहे. त्याशिवाय ह्याच्या कीबोर्डला तुम्ही एका मॅग्नेटिक स्ट्रिपद्वारा जोडू शकता. ह्याची किंमत ३९,९९९ रुपये आहे.
कंपनीने आपल्या tPhone ची घोषणाही केली आहे, ज्याला 18 एप्रिलला लाँच केले जाईल आणि ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. tBook च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12.2 इंचाची IPS डिस्प्ले 2560×1600 पिक्सेलसह मिळते. ह्यात आपल्याला 64-बिटचे इंटेल कोर M प्रोसेसर मिळत आङे, जो 2Ghz ची गती देतो. ह्यात आपल्याला 4GB रॅमसुद्धा मिळत आहे. ह्यात 128GB ची SSD स्टोरेज मिळत आहे, जे आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. त्याशिवाय ह्या टॅबमध्ये आपल्याला 37W.hr ची आकर्षक बॅटरीसुद्धा मिळत आहे, जो कंपनीनुसार १० तासांचा बॅटरी बॅकअप देते. त्याशिवाय ह्यात आपल्याला दोन 3.0 USB पोर्टसुद्धा मिळत आहे. तसेच एक मायक्रो-HDMI आणि एक टाइप C USB ३.० मिळत आहे, ज्याच्या माध्यमातून आपण चार्जिंग करु शकतात.
हेदेखील वाचा – एसर क्रोमबुक 14 लॅपटॉप: १४ तासांपर्यंत देणार बॅटरी लाइफ
हेदेखील वाचा – ४,००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट पॉईंट अँड शूट कॅमेरे