तुमचा स्मार्टफोन फुल चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतोय? आजकाल स्मार्टफोन फास्ट चार्जिंग स्पीडसह येऊ लागले आहेत. पण आपल्या काही चुकांमुळे फोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो. या लेखात आम्ही तुम्हाला 4 टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमचा स्मार्टफोन, मग तो अँड्रॉइड असो किंवा आयफोन, पूर्वीपेक्षा जास्त वेगाने चार्ज होईल.
पहिला आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुमचा स्मार्टफोन चार्ज होत असताना त्याचा वापर करू नका. असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरी सतत खर्च होत असते. त्यामुळे चार्जिंग करताना तुमचा फोन वापरणे टाळा, यामुळे हँडसेट जलद चार्ज होईल.
हे सुद्धा वाचा : Dell G15: Dell ने लाँच केला गेमिंग लॅपटॉप, उत्तम परफॉर्मन्ससह मिळतील आकर्षक फीचर्स
सर्व स्मार्टफोनमध्ये एयरप्लेन मोड दिलेला आहे. चार्जिंग करताना शक्य असल्यास, फोनचा एअरप्लेन मोड चालू करा. हा मोड सर्व आउटगोइंग कनेक्शन जसे की WiFi, मोबाइल डेटा आणि ब्लूटूथ बंद करतो.
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी अनेक लोक लॅपटॉपमध्ये असलेल्या USB पोर्टचा वापर करण्यास सुरुवात करतात. अशाप्रकारे फोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागेल. ही पद्धत केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरली तर अधिक चांगले होईल.
चार्जिंगसाठी नेहमी स्मार्टफोनसोबत आलेला चार्जर वापरा. चार्जर हरवल्यास किंवा खराब झाल्यास बरेच लोक स्वस्त चार्जर किंवा बाजारातील इतर कोणत्याही फोनचे चार्जर वापरण्यास सुरुवात करतात. याचा परिणाम केवळ चार्जिंगच्या स्पीडवर होत नाही तर बॅटरी लाईफवरही होतो.