अवघ्या काही वेळातच फुल चार्ज होईल स्मार्टफोन, 4 टिप्समध्ये वाढेल स्पीड, फक्त ‘या’ सेटिंग्ज बदला

अवघ्या काही वेळातच फुल चार्ज होईल स्मार्टफोन, 4 टिप्समध्ये वाढेल स्पीड, फक्त ‘या’ सेटिंग्ज बदला
HIGHLIGHTS

अवघ्या काही मिनिटांतच तुमचा फोन फुल चार्ज होईल

फक्त काही सेटिंग्स आणि सवयी बदलण्याची गरज आहे

पुढील चार महत्त्वाच्या टिप्स फॉलो करणे उत्तम ठरेल

तुमचा स्मार्टफोन फुल चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतोय? आजकाल स्मार्टफोन फास्ट चार्जिंग स्पीडसह येऊ लागले आहेत. पण आपल्या काही चुकांमुळे फोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो. या लेखात आम्ही तुम्हाला 4 टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमचा स्मार्टफोन, मग तो अँड्रॉइड असो किंवा आयफोन, पूर्वीपेक्षा जास्त वेगाने चार्ज होईल.

फोन चार्ज होत असताना वापरू नका

पहिला आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुमचा स्मार्टफोन चार्ज होत असताना त्याचा वापर करू नका. असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरी सतत खर्च होत असते. त्यामुळे चार्जिंग करताना तुमचा फोन वापरणे टाळा, यामुळे हँडसेट जलद चार्ज होईल.

हे सुद्धा वाचा : Dell G15: Dell ने लाँच केला गेमिंग लॅपटॉप, उत्तम परफॉर्मन्ससह मिळतील आकर्षक फीचर्स

ही सेटिंग चालू करा

 सर्व स्मार्टफोनमध्ये एयरप्लेन मोड दिलेला आहे. चार्जिंग करताना शक्य असल्यास, फोनचा एअरप्लेन मोड चालू करा. हा मोड सर्व आउटगोइंग कनेक्शन जसे की WiFi, मोबाइल डेटा आणि ब्लूटूथ बंद करतो. 

लॅपटॉपवरून चार्ज करू नका

स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी अनेक लोक लॅपटॉपमध्ये असलेल्या USB पोर्टचा वापर करण्यास सुरुवात करतात. अशाप्रकारे फोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागेल. ही पद्धत केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरली तर अधिक चांगले होईल.

हे चार्जर वापरा

चार्जिंगसाठी नेहमी स्मार्टफोनसोबत आलेला चार्जर वापरा. चार्जर हरवल्यास किंवा खराब झाल्यास बरेच लोक स्वस्त चार्जर किंवा बाजारातील इतर कोणत्याही फोनचे चार्जर वापरण्यास सुरुवात करतात. याचा परिणाम केवळ चार्जिंगच्या स्पीडवर होत नाही तर बॅटरी लाईफवरही होतो.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo