डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशन म्हणजेच Dotचा Sim Card संबंधित बदल करण्याचा विचार आहे. सरकारने नव्या नियमांचा प्रस्ताव आणला आहे. त्यामध्ये एका IDवर उपलब्ध असलेल्या सिमची संख्या कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आतापर्यंत एका व्यक्तीला एका IDवर कमाल 9 सिम देण्यात येत होते. पण आता Dotने KYC प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत, पुढील 6 महिन्यात नवे नियम जारी होण्याची शक्यता आहे.
नव्या बदलांमध्ये एका ID वर केवळ 5 सिम कार्ड जारी करण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. पूर्वी म्हणजेच सध्या ही संख्या 9 आहे. नव्या सिम कार्डसाठी कुठलेही दस्तऐवज लागणार नाहीत. म्हणजेच युजर्स डिजिटल पद्धतीने सिम कार्ड जरी करू शकतील. त्याचप्रमाणे नवीन सिम मिळवण्यासाठी, फेस ID AI च्या मदतीने युजर्सना ओळखले जाईल.
अहवालानुसार, Dot बनावट सिम कार्डच्या फसवणुकीची समस्येचे निराकरण करण्यासाठी नियमांमध्ये बदल करणार असल्याचे समोर आले आहे. यासाठी सरकारकडून डिजिटल डॉक्युमेंट वेरिफिकेशन्स अनिवार्य करण्यात येणार आहे. नव्या सिस्टममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनावट सिम कार्ड वर बंदी आणण्यात येणार आहे. नव्या सिस्टम अंतर्गत, पूर्वीपासून सक्रिय असलेले सिम मोबाईलमध्ये इन्स्टॉल करता येणार नाहीत. फोनमध्ये सिम टाकल्यासच ते ऍक्टिव्ह करता येतील. तुम्ही आधीच ऍक्टिव्ह असलेले नवीन सिम कार्ड टाकल्यास, तुमचा फोन लॉक होईल.