ब्रह्मास्त्र चित्रपटात शाहरुख खानला कॅमिओमध्ये पाहून चाहते खूप खूश आहेत. या चित्रपटातील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरुखचा हा सीन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सीन असल्याचे चाहते सांगितले आहेत. किंग खान पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2023 मध्ये त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय शाहरुखही डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. शाहरुखने चाहत्यांना ही खास भेट दिली आहे.
हे सुद्धा वाचा : Kodak Matrix QLED TV series: तीन पावरफुल QLED टीव्ही 4K डिस्प्लेसह लाँच, जाणून घ्या किंमत
तुम्हाला आठवत असेल शाहरुखने गेल्या वर्षी DISNEY + HOTSTAR चा प्रोमो केला होता. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार शाहरुख DISNEY + HOTSTAR साठी वेब सीरिज करणार आहे. हे त्याचे डिजिटल पदार्पण असेल. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, शाहरुख खान DISNEY + HOTSTAR मधून डिजिटल पदार्पण करणार आहे. सुपरस्टारने एका वेब सीरिजवर साइन केली आहे, जी या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल. वेब सीरिजबद्दल अधिक तपशील सध्या पडद्याआड ठेवण्यात आले आहेत.
https://twitter.com/iamsrk/status/1436625254235791360?ref_src=twsrc%5Etfw
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शाहरुख खानचा प्रोमो व्हिडिओ शेअर करताना करण जोहर म्हणाला होता, "बॉलिवुडचा बादशाह खान इतका खळबळ उडवून देईल, असे कधीच वाटले नव्हते." आता मी काहीही बघायला तयार आहे. यावर शाहरुखने ट्विट केले की, हम्म… पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त।
शाहरुखच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' करत आहे. याशिवाय त्याच्याकडे 'जवान' आणि 'डंकी' चित्रपट देखील आहेत.