आजकाल प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंटद्वारे व्यवहार करतानाचे चित्र सर्वत्र दिसून येते. असे क्वचितंच काही लोक असतील, जे पारंपरिक पद्धतीने म्हणजेच कॅश देऊन व्यवहार पूर्ण करतात. मात्र, कॅशलेस पेमेंट करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम किंवा इंटरनेट असणे आवश्यक आहे. पण, एखादेवेळी तुमचे इंटरनेट रिचार्ज संपले आहे आणि तुम्हाला तातडीने पेमेंट करायचे आहे. तर, अशा वेळी काय कराल ? तर आता काळजी करू नका. कारण इंटरनेटशिवायही पेमेंट शक्य आहे. कसे ते बघुयात-
इंटरनेटशिवाय पेमेंटसाठी तुम्हाला केवळ एक नंबर डायल करावा लागेल. याद्वारे तुम्ही फिचर फोनने देखील ऑनलाईन पेमेंट करू शकता. '*99# ' या नंबरद्वारे तुम्ही विना इंटरनेट पेमेंट करू शकता. सर्व बँकिंग सेवांसह हा क्रमांक येतो. यामध्ये एकूण 83 बँक आणि चार टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सचा समावेश आहे. याद्वारे तुम्हाला अनके महत्त्वाची कामे करता येतील. म्हणजेच पैसे पाठवणे, UPI पिन बदलणे आणि शिल्लक तपासणे इ. कामे करता येतील.
– यासाठी तुम्हाला सर्वप्रथम *99# हा नंबर डायल करावा लागेल.
– तुमच्या बँक खात्यातील रजिस्टर्ड नंबरवरूनंच हा क्रमांक डायल करा.
– यानंतर भाषा आणि बँकेचे नाव टाकावे लागेल.
– ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या डेबिट कार्डवरील एक्सपायरी डेट आणि कार्डवरील शेवटचे सहा अंक टाकावे लागतील. अशाप्रकारे तुम्हाला आता पेमेंट करता येईल.
– वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत तो नंबर डायल करा आणि नंतर '1' दाबा, जो पैसे ट्रान्सफर करण्यासाठी असेल.
– यानंतर तुम्हाला ''UPI ID/ फोन नंबर/ बँक अकाउंट नंबर'' असे काही पर्याय दिले जातील. हे तुम्हाला त्या व्यक्तीचे सिलेक्ट करावे लागतील, ज्यांना तुम्ही पैसे पाठवणार आहात.
– यानंतर तुम्हाला अमाऊंट टाकावी लागेल आणि UPI पिन टाकावा लागेल.
– आता तुमची पेमेंट प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
टीप : वरील प्रक्रिया आणि माध्यमांद्वारे तुम्ही 5 हजार रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता.