अलीकडे, OTT प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे एक उत्तम साधन बनले आहे. आता क्रिकेटच्या मॅचेस, रिअॅलिटी शोज, सीरियल एपिसोड किंवा अगदी चित्रपट, अशा सर्व गोष्टी इंटरनेट मोबाइलच्या माध्यमातून OTT प्लॅटफॉर्मवर कधीही पाहता येतात. हा सर्व कंटेंट इंटरनेट Internet कनेक्शनशिवाय पाहता येत नाही. मात्र, आता हा सर्व कंटेंट इंटरनेटशिवाय पाहणे शक्य होणार आहे. यासाठी D2M अर्थात डायरेक्ट टू मोबाइल ब्रॉडकास्टिंग टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे. या नवीन टेक्नॉलॉजीवर सध्या काम सुरू आहे.
क्रिकेटचा लाइव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी किंवा इतर मल्टीमीडिया कंटेंट ऍक्सेस करण्यासाठी आता इंटरनेटची गरज उरणार नाही. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि प्रसार भारती एकत्र D2M ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. त्यामुळे, लवकरच युझर्सना इंटरनेटशिवाय मल्टीमीडिया कंटेंट बघतां येणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे सुद्धा वाचा : चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 19 जून रोजी NETFLIX वर रिलीज होणार BHOOL BHULAIYA 2
या टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुमच्या मोबाइलवर थेट मल्टिमीडिया कंटेंट प्रसारित होईल. जसे, FM ऐकण्यासाठी कोणत्याही वायर्ड कनेक्शनची गरज नसते, अगदी त्याचप्रमाणे हा कंटेंट तुमच्या मोबाइलवर दिसेल. यामुळे तुम्हाला क्रिकेटची मॅच लाइव्ह पाहता येईल. तसेच ताज्या बातम्या आणि इतर कंटेंटही पाहता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून युझर्सना त्यांच्या मोबाइलवर इंटरनेटशिवाय OTT कंटेंट पाहता येईल.
ही टेक्नोलॉजी ब्रॉडबॅंड आणि ब्रॉडकास्ट एकत्र करून विकसित करण्यात येत आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5G ब्रॉडबँड कन्व्हर्जन्स रोड मॅप फॉर इंडिया कार्यक्रमात या टेक्नॉलॉजीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली.
इंटरनेट कनेक्शन स्लो असेल, तर व्हिडिओच्या व्हिज्युअल कॉलिटीत फरक पडतो आणि व्हीडिओ देखील थांबतो. नव्या ब्रॉडकास्ट तंत्रामुळे या समस्या होणार नाहीत. कारण यात इंटरनेटचा वापरच केला जाणार नाही. कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये स्लो इंटरनेटची समस्या होणार नाही,अशी माहिती दिली जात आहे. प्रत्येक माहिती युझर्सपर्यंत थेट पोहोचेल. ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही किंवा स्लो इंटरनेट आहे, अशा भागातील नागरिकांसाठी हे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरणार आहे. जर ही टेक्नॉलॉजी सक्सेस झाली, तर D2M ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजी देशातील एक मोठी गेमचेंजर ठरणार आहे.