काय आहे Thunderstrom च्या मागील विज्ञान? अशा प्रकारचे वादळ आल्यावर काय करावे आणि काय करू नये
तुम्हाला माहिती आहे का Thunderstrom च्या मागील विज्ञान काय आहे, हा कसा निर्माण होतो आणि यापासून कसे वाचता येईल, चला तर जाणून घेऊया.
आपण खुपदा ऐकले असेल की एक मोठे वादळ आल्यामुळे शहरे नेस्तनाबूत झाली आहेत, हजारोंचे प्राण गेलेत, शेकडो जख्मी आहेत. असे फक्त भारतात नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये झाले आहे. जपान मध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे मोठे वादळ दरवर्षी येतात, भारतात पण अशी अनेक वादळ आले आहेत. पुन्हा एकदा भारतात असे वादळ येण्याची शक्यता आहे.
दिल्ली सह पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा राजस्थान सह उत्तराखंड आणि देशातील इतर अनेक ठिकाणी Thunderstrom येणार्या काही काळात येऊ शकतो. गृह मंत्रालयाकडून मिळालेली माहिती पाहता देशातील जवळपास 13 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशांत येणार्या काही तासांमध्ये जोरात वादळ आणि पाऊस येऊ शकतो. जर मागचा आठवडा पाहिला तर अशा प्रकारच्या घटनेत जवळपास 124 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि जवळपास 300 लोक जख्मी झाले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का या वादळ इत्यादी मागे काय विज्ञान असते ते. आज त्याविषयी जाणून घेऊया.
Thunderstrom च्या मागील काय आहे विज्ञान?
वातावरणात विद्युत प्रभाव डिस्चार्ज होणे किंवा एका वास्तु मधून दुसर्या मध्ये स्थानांतरीत होण्या ने असे होते. असे पण म्हणू शकतो, की जेव्हा असे होते तेव्हा एक भयानक गडगडाट होतो, ज्याला आपण thunder म्हणतो. जर आकडे बघितले तर विकीपीडिया सांगते की प्रत्येक वर्षी जगभरात जवळपास 1 कोटी 60 लाख Thunder निर्माण होतात. याबद्दल सविस्तर बोलायचे झाले तर “Thuder काळ्या ढगांमध्ये उत्पन्न होतो. या ढगांमध्ये जोरदार ऊर्ध्वगामी वारे वाहतात, जे जवळपास 40,000 फुटांच्या ऊंची वर पोहोचतात. यात काही अशा क्रिया होताता ज्यामुळे यात विद्युत प्रभाव निर्माण होतो.
आता तुम्हाला अंदाज आला असेल हे किती भयानक आहे ते, यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. या विज्ञानामुळे ही प्राकृतिक घटना इतकी भयानक बनते, थांबवणे कोणाच्या हातात नाही. असेच काहीसे आपल्या देशातील काही राज्यांमध्ये होणार आहे, ज्यामुळे दिल्ली सरकार ने याबद्दल एक ऐडवाइजरी जारी केली आहे, त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. हरियाणा मध्ये पुढील दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
वादळ आल्यावर काय करावे आणि काय करू नये
• जर तुम्ही चुकून वादळात अडकलात तर तुमचा चेहरा आणि शरीर जपा. असे न केल्यास तुम्हाला स्किन इन्फेक्शन होऊ शकते, त्याचबरोबर तुम्हाला रॅश पण होऊ शकतात.
• जर तुम्ही वादळात अडकलात तर सर्वात आधी अशी जागा शोधा जिथे तुम्ही सुरक्षित राहू शकतात, कोणत्याही छतापासून किंवा खिडकी पासून लांब रहा.
• जर तुम्ही तुमच्या घरात असाल तर घराच्या खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद करून घ्या आणि त्या बाजूला वजनदार वस्तू ठेवा. असे केल्याने जोरदार हवा आल्यावरही हे उघडणार नाहीत.
• जर तुमच्या खिडक्या इत्यादी काचेचे असतील तर ते पडद्याने किंवा कपड्याने ढाकून ठेवा.
• अशा वेळी विद्युत उपकरणे वापरू नका.
• अशी जागा शोधा जिथे जास्त झाडे, विजेचे खांब किंवा भिंती इत्यादी नसतील, असे केल्याने तुमच्या वर हे पडणार नाहीत.
• जर तुम्ही गाडीत असाल तर गाडी योग्य रित्या बंद करायाला विसरू नका तसेच आपली गाडी विजेचे खांब आणि झाडे यांच्या जवळ ठेऊ नका.
• वादळाच्या बातम्या सारख्या मिळतील याची काळजी घ्या.
• आपल्या गाडीत रेडियो वापरू नका त्यामुळे तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता आहे.
• वादळाच्या वेळी जर तुम्ही आंघोळ करत असाल किंवा पाण्यात असाल तर त्यापासून दूर राहा कारण वीज पाण्यात लवकर पसरते.
• घरातून बाहेर पडणे टाळा, अशा वेळी घरातील वीज घेतल्यास तुमच्या जवळ टॉर्च, मेणबत्ती, माचिस इत्यादि सह खाण्यापिण्याच्या वस्तु ठेवा.