स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला बँकेशी संबंधित छोट्या-छोट्या कामासाठी बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. SBI ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. जाणून घ्या, SBI च्या ग्राहकांना व्हाट्सऍपवर मिळणाऱ्या सेवांबद्दल सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : Realme Watch 3 Pro : स्मार्टवॉचची लाँच डेट कन्फर्म, उत्तम फीचर्ससह सुसज्ज, वाचा डिटेल्स
'या' सेवा SBIच्या WhatsApp सेवेद्वारे उपलब्ध असतील.
> अकाउंट बॅलेन्स
> मिनी स्टेटमेंट (शेवटचे 5 व्यवहार)
SBI ने हे देखील सांगितले आहे की, आता खातेदार YONO ऍपमध्ये लॉग इन न करता किंवा मिनी स्टेटमेंटसाठी ATM ला भेट न देता WhatsApp वर ही माहिती ऍक्सेस करू शकतात. त्यामुळे, जर तुमचेही SBI मध्ये खाते असेल आणि तुम्हाला नवीन SBI WhatsApp बँकिंग सुविधा वापरायची असेल तर तुम्हाला तुमचे SBI खाते WhatsApp सेवेसाठी रजिस्टर करावे लागेल. त्याआधी SMS द्वारे तुमची संमती द्यावी लागेल.
स्टेप 1: SBI Whatsapp बँकिंग सेवेसह बँक खाते नोंदणी करण्यासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 'SMS WAREG A/C' लिहून '917208933148' क्रमांकावर पाठवा. नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्ही SBI ची Whatsapp सेवा वापरण्यास सक्षम असाल.
स्टेप 2: Whatsapp वर +909022690226 यावर 'Hi' पाठवा . हा पॉप अप मॅसेज उघडेल.
स्टेप 3: आता तुम्हाला अकाउंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, डी-रजिस्टर व्हाट्सएप बँकिंगचा पर्याय दिला जाईल.
स्टेप 4: खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी, तुम्हाला 1 टाइप करावे लागेल तर मिनी स्टेटमेंटसाठी तुम्हाला 2 टाइप करावे लागेल.