स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपली WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एकाने अधिकृत ट्विटद्वारे ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली. WhatsApp वर उपलब्ध असलेल्या अशा बँकिंग सेवा वापरकर्त्यांसाठी काही कामे आणखी सोपे करेल. मुख्य म्हणजेच त्यांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी नवीन ऍप डाउनलोड करण्याची किंवा ATM ला भेट देण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सऍपवर सर्व कामे होतील.
हे सुद्धा वाचा : Vivo चा 20,000 रुपयांपेक्षा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
SBI ने ट्विटरवर लिहिले, 'तुमची बँक आता व्हॉट्सऍपवर आहे. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घ्या आणि चालत बोलता मिनी स्टेटमेंट पहा. WhatsApp बँकिंग सेवांसाठी, वापरकर्त्यांना फक्त +919022690226 या क्रमांकावर 'HI' पाठवावा लागेल.'
स्टेप 1 : तुम्हाला प्रथम SBI WhatsApp बँकिंग सेवांसाठी तुमचे अकाउंट रजिस्टर करावी लागेल.
स्टेप 2 : या सेवांसाठी नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला बँकेत रजिस्टर्ड तुमच्या 10 अंकी मोबाइल क्रमांकावरून 917208933148 वर "SMS WAREG A/c No" पाठवावा लागेल.
स्टेप 3 : नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, +919022690226 या क्रमांकावर 'HI' पाठवा.
स्टेप 4 : त्यानंतर, तुम्हाला "प्रिय ग्राहक, SBI WhatsApp बँकिंग सेवांमध्ये आपले स्वागत आहे" असा संदेश प्राप्त होईल.
खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा-
1. अकाउंट बॅलेन्स
2. मिनी स्टेटमेंट
3. व्हॉट्सऍप बँकिंगमध्ये डी-रजिस्टर
प्रारंभ करण्यासाठी तुम्ही तुमची क्वेरी देखील टाइप करता येईल.
स्टेप 5 : तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा. तुमचे अकाउंट बॅलेन्स तपासण्यासाठी '1' टाइप करा, तर मिनी स्टेटमेंटसाठी '2' टाइप करा. तुमचे अकाउंट बॅलेन्स किंवा मिनी स्टेटमेंट आता WhatsApp वर प्रदर्शित केले जाईल.
या व्यतिरिक्त, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना SBI कार्ड WhatsApp Connect या नावाने WhatsApp-आधारित सेवा देखील प्रदान करते. ही सेवा SBI क्रेडिट कार्ड ग्राहकांना त्यांची अकाउंट समरी, रिवॉर्ड पॉइंट्स, कार्ड पेमेंट इत्यादी तपासण्याची परवानगी देते.