digit zero1 awards

संजय लीला भन्साळींच्या सिरीजमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींची गर्दी, लवकरच Netflix वर होणार रिलीज

संजय लीला भन्साळींच्या सिरीजमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींची गर्दी, लवकरच Netflix वर होणार रिलीज
HIGHLIGHTS

संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट 'हिरामंडी'

चित्रपटगृहात नाही तर OTTवर होणार रिलीज

हा चित्रपट वैश्यांच्या जीवनावर आधारित आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध इंडियन फिल्ममेकर संजय लीला भन्साळी यांचा एक जबरदस्त प्रोजेक्ट समोर आला आहे. संजय लीला भन्साळी आता त्यांचा आगामी चित्रपट 'हिरामंडी' घेऊन येत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही तर OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट वैश्यांच्या जीवनावर आधारित आहे, पण दिग्दर्शकाने हा काळ भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी घेतला आहे. या चित्रपटाचा टीजरदेखील पुढे आला आहे. 

हे सुद्धा वाचा : अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा स्मार्टफोन, Amazon वर मिळतोय भरघोस डिस्काउंट

हिरामंडीचा फर्स्ट लूक पाहून तुम्हालाही अंदाज येईल की, हा चित्रपट किती भव्यदिव्य असणार आहे. त्याबरोबरच, प्रसिद्ध अभिनेत्रींच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होणार आहे. पोस्टरमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह सर्व अभिनेत्री दागिन्यांनी सजलेल्या पिवळ्या साड्यांमध्ये उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे पोस्टर खूपच प्रेक्षणीय आहे. तो आतापर्यंत 8.41 लाख लोकांनी पाहिला आहे आणि खूप पसंत केला जात आहे.

 

 

'हीरामंडी' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची गर्दी आहे. या सिरीजमध्ये  आदिती राव हैदरी, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोयराला, रिचा चढ्ढा यांसारख्या अभिनेत्री दिसणार आहेत. या सिरीजमध्ये 1947 पूर्वीची हिरामंडीची कथा पुन्हा जिवंत करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संजय लीला भन्साळी आता हीरामंडीसोबत तो पुन्हा एकदा महिला केंद्रित प्रकल्प घेऊन आले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून 'गंगुबाई' या प्रसिद्ध चित्रपटानंतर ते पुन्हा एकदा वैश्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांनी त्याच्या रिलीजच्या तारखेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo