Samsung Galaxy Tab A9 आणि Galaxy Tab A9+ कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच केले. लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी कंपनीने आता हे टॅब स्वस्त केले आहेत. नवीन किंमत जाणून घेण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की, हे कंपनीच्या बजेट रेंजमध्ये येणारे टॅबलेट आहेत. दोन्ही टॅबमध्ये 8MP रियर कॅमेरा आहे. मात्र, सेल्फीसाठी, A9 मध्ये 2MP फ्रंट कॅमेरा आहे, तर A9 Plus मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy Tab A9 आणि Galaxy Tab A9+ ची नवी किंमत.
हे सुद्धा वाचा: 5000mAh बॅटरीसह परवडणाऱ्या Oppo फोनमध्ये मोठी Price Cut! प्रत्येकाच्या बजेटमध्ये उपलब्ध। Tech News
याआधी Samsung Galaxy Tab A9 ची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये होती. दुसरीकडे, Galaxy Tab A9+ रु. 18,999 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. आता कंपनीने हे दोन्ही टॅब 1000 रुपयांनी स्वस्त केले आहेत.
कपातीनंतर तुम्ही Samsung Galaxy Tab A9 केवळ 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर, A9 Plus 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. दोन्ही टॅबची नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाइव्ह झाली आहे. टॅबमध्ये सिल्व्हर, नेव्ही आणि ग्रेफाइट कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy Tab A9 मध्ये 8.7-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. तर, Galaxy Tab A9 Plus मध्ये 11-इंच लांबीचा डिस्प्ले आहे.
Galaxy Tab A9 मध्ये MediaTek Helio प्रोसेसर आहे. तर, A9 Plus मॉडेल Qualcomm Snapdragon प्रोसेसरने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी या दोन्ही टॅबमध्ये 8MP रियर कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेराच्या बाबतीत, दोन्ही टॅब एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. टॅबच्या A9 मॉडेलमध्ये 2MP फ्रंट कॅमेरा आहे. तर, A9 Plus मॉडेलमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे.
Samsung Galaxy Tab A9 मध्ये 5,100mAh बॅटरी आहे. तर, Galaxy Tab A9+ मॉडेलमध्ये 7,040mAh बॅटरी आहे.