Samsung ने अलीकडेच याची घोषणा केली आहे कि ते जगातील पहिली 1TB eUFS (embedded Universal Flash Storage) फोन निर्माता कंपन्यांसाठी घेऊन येणार आहे. यासाठी कंपनी ने यावर काम करायला पण सुरवात केली आहे.
महत्वाचे मुद्दे:
स्मार्टफोन निर्मात्यांसाठी होईल उपलब्ध
फोन्स मध्ये मिळेल एक टेराबाइट स्टोरेज
512GB असेल चिपची साइज
Samsung ने अलीकडेच याची घोषणा केली आहे कि ते जगातील पहिली 1TB eUFS (embedded Universal Flash Storage) फोन निर्माता कंपन्यांसाठी घेऊन येणार आहे. यासाठी कंपनी ने यावर काम करायला पण सुरवात केली आहे. आता फोन्स मध्ये यूजर्सना सिंगल फ्लॅश मेमरी चिप सोबतच एक टेराबाइट स्टोरेज मिळू शकेल. स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग ने नुकतीच याची घोषणा केली आहे कि त्यांनी स्मार्टफोन्स साठी जगातील पहिली एक-टेराबाइट (टीबी) चिप तयार केली आहे ज्यावर कंपनी सध्या काम करत आहे.
सॅमसंगचे म्हणणे आहे कि या चिप मुळे जगभरातील मोबाईल निर्माता आपल्या सर्व डिवाइस मध्ये एक फ्लॅश मेमोरी चिप सह 1 टीबी ची इंटरनल स्टोरेज यूजर्सना देऊ शकतील. विशेष म्हणजे या चिप मुळे आधी सादर करण्यात आलेल्या 512GB युनिटची क्षमतेच्या साइज मधेच 1टीबी चिप चा स्पीड वाढेल आणि हि एका microSD कार्ड पेक्षा 10 पॅट चांगला स्पीड देईल. महत्वाचे म्हणजे हि चिप सॅमसंगच्या 'वी-एनएएनडी' फ्लॅश मेमरी आणि अलीकडेच तयार करण्यात आलेल्या प्रॉपराइटरी कंट्रोलर वर आधारित चिप आहे.
Samsung मेमरी मार्केटिंगचे VP Cheol Choi म्हणाले कि, "पुढील पिढीच्या मोबाईल डिवाइसेस मध्ये नोटबुक सारखा यूजर एक्सपीरियंस देण्यास 1टीबी ईयूएफएल खूप उपयोगी पडेल." Samsung ने आपल्या एका विधानात सांगितले कि स्मार्टफोन यूजर्स आता 1TB eUFS म्हणजे एम्बेडेड यूनिवर्सल फ्लॅश स्टोरेज सह 10 मिनिटांचे 260 वीडियो 4K यूएचडी फार्मेट मध्ये स्टोर करू शकतील. तसेच 64जीबी ची क्षमता असलेले स्मार्टफोन्स याच साइजचे 13 वीडियो स्टोर करू शकतील.