Samsung Sale : स्मार्टफोनसोबत, तुम्हाला TV वरही मिळेल भरघोस सूट, जाणून घ्या सर्व ऑफर

Updated on 22-Sep-2022
HIGHLIGHTS

Samsung कडून 'NO MO' FOMO फेस्टिव्हल सेल जाहीर

सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत

एवढेच नाही, तर स्मार्ट TV, एअर कंडिशनर्स, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर इ. वर देखील भारी सूट

Amazon इंडिया आणि Flipkart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची विक्री 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण याआधी सॅमसंगने आपला 'NO MO' FOMO फेस्टिव्हल सेल जाहीर केला आहे. ही सेल 20 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. सेलमध्ये, गॅलेक्सी फोन, टॅब्लेट आणि वेअरेबल उपकरणांव्यतिरिक्त, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्ह देखील अर्ध्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. या सर्व ऑफर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, सॅमसंग एक्सक्लूसिव्ह स्टोअर्स आणि सॅमसंग शॉप ऍपवर उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल प्राईम सदस्यांसाठी सुरु, बघा फोनवरील सर्वोत्तम डिल्स

'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत

Galaxy S21 FE 5G

या सेलमध्ये Samsung Galaxy S21 FE 5G 31,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. Galaxy S21 FE 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये आहे. परंतु सॅमसंगच्या सेलमध्ये हा फोन अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये बँक ऑफर्सचाही समावेश आहे. यासह, 24,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध असेल.

Samsung Galaxy S22+

या सेलमध्ये सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy S22+ वर देखील 59,999 रुपयांची सूट मिळत आहे. 8 GB रॅमसह फोनच्या 128 GB स्टोरेजची किंमत 1,01,999 रुपये आहे. जी सेलमध्ये 69,999 रुपये इतकी येईल. तर, 1,05,999 रुपयांच्या 8 GB रॅमसह 256 GB स्टोरेज 88,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. यासोबतच फोनवर 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध असेल.

स्मार्ट TV वरील सवलत

सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर 48 टक्क्यांपर्यंत सूटही उपलब्ध आहे. सेल दरम्यान, QLED आणि UHD टीव्ही देखील कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. 21,490 रुपयांचा Galaxy A32 स्मार्टफोन Neo QLED, The Frame आणि UHD TV च्या अनेक मॉडेल्सच्या खरेदीवर मोफत दिला जात आहे. या सेलमध्ये सॅमसंग डिजिटल उपकरणे जसे की एअर कंडिशनर्स, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्हवर 43% सूट दिली जात आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :