ह्या टॅबलेटमध्ये १८. ४ इंचाचा पुर्ण HD डिस्प्ले असेल. ज्याचे स्क्रीन रिझोल्युशन १९२०x१०८० पिक्सेल आहे. ह्या डिवाईसमध्ये एक्सनोस 7 सोबत 1.6GHz ऑक्टाकोर प्रोसेसरसुद्धा असू शकतो. टॅबलेटमध्ये 2जीबी रॅम आणि 32 जीबी अंतर्गत स्टोरेजसुद्धा असू शकतो.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी सॅमसंगने १८.४ इंचाचा डिस्प्ले असलेला टॅबलेट गॅलेक्सी व्यू बनवत आहे. सध्या तरी ह्यावर काम चालू आहे. मात्र अशी माहिती मिळत आहे की, लवकरच कंपनी हा नवीन टॅबलेट सादर करेल. कंपनीने ह्या टॅबलेटसंबंधी IFA च्या वेळी गियर S2 स्मार्टवॉच लाँचच्या वेळी सांगितले होते. कंपनीद्वारा टॅबलेटच्या लाँचच्या वेळेसंबंधी कोणती माहिती दिली गेली नाही. मात्र आशा आहे की, हा टॅबलेट येणा-या काही आठवड्यातच अधिकृतरित्या लाँच केला जाईल.
अलीकडेच ह्या डिव्हाईसचा तपशील लीक झाला होता, ज्यात ह्या डिवाईसला प्रत्येक कोनातून अगदी सहजपणे पाहू शकतो. कंपनीच्या ह्या टॅबलेटमध्ये लॅपटॉपच्या आकाराइतकी स्क्रीन असेल.
सॅममोबाईलवर लीक झालेल्या फोटोबरोबरच ह्या टॅबलेटचा प्रमोशन व्हिडियोसुद्धा लीक झाला आहे. लीक झालेल्या चित्रात टॅबलेटच्यावर १८.४ इंचाचा डिस्प्ले असे लिहिले आहे. मोठ्या आकाराचा असूनसुद्धा ह्या डिवाईसला सांभाळणे खूप सोपे आहे. तसेच डिस्प्ले वर कोणतेही फिजिकल होम बटण नाहीय.
ह्याआधी लीक झालेल्या लीक्सनुसार, टॅबलेटमध्ये १८.४ इंचाचा पुर्ण HD डिस्प्ले असेल. ज्याचे स्क्रीन रिझोल्युशन १९२०x१०८० पिक्सेल आहे. ह्या डिवाईसमध्ये एक्सनोस 7सोबत 1.6GHz ऑक्टाकोर प्रोसेसरसुद्धा असेल. टॅबलेटमध्ये २जीबी रॅम आणि ३२जीबी अंतर्गत स्टोरेजसुद्धा असू शकते. मात्र मायक्रोएसडी कार्डबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. गॅलेक्सी व्ह्यूमध्ये २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी ५,७००mAh बॅटरीसुद्धा असू शकते. हा टॅबलेट अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ५.१ लॉलीपॉपवर आधारित असू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटूथ आणि वायफायसुद्घा असण्याची शक्यता आहे.