अनेक AI फीचर्ससह Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra भारतात लॉन्च, पहा किंमत 

अनेक AI फीचर्ससह Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra भारतात लॉन्च, पहा किंमत 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra टॅबलेट भारतीय बाजारात लाँच

Samsung Galaxy Tab S10 Series सोबत Samsung Galaxy S24 FE देखील लाँच

Samsung चे लेटेस्ट टॅब्स अनेक आकर्षक AI फीचर्सद्वारे सुसज्ज

Samsung चे Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra टॅबलेट भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. नवे टॅब्स अनेक अपग्रेडसह भारतात सादर केले गेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने Samsung Galaxy Tab S10 Series सोबत Samsung Galaxy S24 FE देखील लाँच केला आहे. मात्र, हा फोन नुकताच ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra ची किंमत आणि सर्व फीचर्स-

 Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra टॅबलेट भारतीय बाजारात लाँच

Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra ची किंमत

Samsung Galaxy Tab S10+ ची किंमत 90,999 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत टॅबच्या Wi-Fi, 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत आहे. तर, Galaxy Tab S10+ टॅबच्या 5G, 12GB / 256GB व्हेरिएंटची किंमत 1,04,999 रुपये इतकी आहे. तर, दुसरीकडे Galaxy Tab S10 Ultra टॅबच्या Wi-Fi, 12GB / 256GB व्हेरिएंटची किंमत 1,08,999 रुपये आहे. या टॅबचा टॉप व्हेरिएंट 1,33,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. भारतात हे टॅब्स मूनस्टोन ग्रे आणि प्लॅटिनम सिल्व्हर या दोन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहेत.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही टॅबहे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून हे टॅब्स प्री-बुक केले जाऊ शकतात. प्री-बुकिंगवर तुम्हाला 35,100 रुपयांपर्यंतचे फायदे, 15,000 रुपयांपर्यंत सूट, 999 रुपयांमध्ये Galaxy Buds FE इ. बरेच काही मिळेल.

Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra

डिस्प्ले

Samsung Galaxy Tab S10 Ultra टॅबलेटमध्ये 14.6-इंच लांबीचा AMOLED 2x डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, Galaxy Tab S10+ मध्ये 12.4 इंच लांबीचा AMOLED 2x डिस्प्ले आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1752 x 2800 आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

दोन्ही उपकरणे डायमेंसिटी 9300+ प्रोसेसरसह येतात. टॅब S10 प्लस 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येतो. अल्ट्रा 16GB+ 1TB प्रकारात देखील येतो.

 Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra टॅबलेट भारतीय बाजारात लाँच

बॅटरी

Samsung Galaxy Tab S10 Ultra टॅब 45W फास्ट चार्जिंगसह 11,200mAh बॅटरीसह येतो. तर, Samsung Galaxy Tab S10+मध्ये 10,090mAh बॅटरी आहे.

कॅमेरा

दोन्ही टॅब्लेटमध्ये 13MP मुख्य आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, अल्ट्रामध्ये 12MP + 12MP कॅमेरा आहे. प्लसमध्ये फक्त 12MP कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

AI फीचर्स

दोन्ही टॅबलेटमध्ये Galaxy AI समर्थित नोट असिस्ट, ड्रॉईंग असिस्ट (स्केच टू इमेज), जेमिनी AI, Bixby AI, सर्कल टू सर्च आणि तुमच्या घरातील स्मार्ट कनेक्टेड डिव्हाइसेसचे 3D मॅप व्ह्यू यांचा समावेश आहे. या सॅमसंग टॅबलेटसाठी बुक कव्हर कीबोर्डमध्ये Galaxy AI ऍक्टिव्ह करण्यासाठी एक बटण देण्यात आले आहे, ज्याला Galaxy AI Key म्हणतात. वापरकर्ते Air Command वापरून Galaxy AI फिचर सहजपणे ॲक्सेस करू शकतात. तुम्ही कॅमेरे देखील सहज नियंत्रित करण्यास सक्षम असाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo