सॅमसंग गॅलेक्सी टॅब आयरिश टॅबलेट लाँच, किंमत १३,४९९ रुपये
हा आयरिश टेक्नॉलॉजी आणि USB OTG सपोर्टने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये सरकारी आणि कॉर्पोरट कर्मचा-यांना लक्षात घेता बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर दिला गेला आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात आपला नवीन टॅबलेट गॅलेक्सी टॅब आयरिश लाँच केला आहे. ह्या टॅबलेटला मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत बनवले गेले आहे. भारतात ह्या टॅबलेटची किंमत १३,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्या डिवाइसची खास गोष्ट म्हणजे हा आयरिश टेक्नॉलॉजी आणि USB OTG सपोर्टने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये सरकारी आणि कॉर्पोरट कर्मचा-यांना लक्षात घेता बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर दिला गेला आहे. हा टॅबलेट 3G ला सुद्धा सपोर्ट करतो. ह्या डिवाइसमध्ये 7 इंचाची WSVGA डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. ह्या टॅबलेटमध्ये 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB ची LPDDR3 रॅमसुद्धा आहे.
हेदेखील पाहा – भारतातील सर्वोत्कृष्ट DSLR कॅमेरे
त्याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी टॅब आयरिश टॅबलेटमध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर आधारित आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. हा 3600mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्याचे वजन 327 ग्रॅम आहे. ह्यात वायफाय, ब्लूटुथ आणि मायक्रो-USB कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स दिले आहे.
हेदेखील वाचा – फ्लिपकार्टवर मिळत आहे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर भारी सूट
हेदेखील वाचा – जगातील पहिला क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन अखेर लाँच, किंमत १९,९९९ रुपये
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile