प्रसिद्ध टेक जायंट Samsung ने Samsung Galaxy Ring ची प्री-बुकिंग आज म्हणजेच 14 ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. कोरियन टेक कंपनी सॅमसंगने या वर्षी जुलैमध्ये स्मार्ट रिंग लॉन्च केली होती. ही स्मार्ट रिंग अत्यंत जबरदस्त फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. तुमच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी या स्मार्ट रिंगमध्ये अनेक ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंग फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या अत्याधुनिक रिंगमध्ये हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजनचे निरीक्षण करण्याची सुविधा आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy Ring चे प्री-बुकिंग डिटेल्स-
Also Read: लेटेस्ट OPPO F27 5G फोनवर आश्चर्यकारक डील उपलब्ध, Amazon सेलदरम्यान खरेदी करण्याची संधी
Samsung Galaxy Ring खरेदी करण्यास इच्छुक ग्राहक Samsung च्या अधिकृत वेबसाइट, Amazon India आणि Flipkart वरून 1,999 रुपयांमध्ये प्री-बुक करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीचा वायरलेस चार्जर ड्युओ पॅड देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 4,999 रुपये आहे. विशेष म्हणजे याद्वारे इअरबड्स, फोन आणि इतर क्यूई सपोर्टेड उपकरणे देखील चार्ज करता येतात. लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप आपल्या स्मार्ट रिंगची भारतीय किंमत जाहीर केलेली नाही.
Samsung Galaxy Ring च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिंगमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. तसेच, याद्वारे रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजता येते. एवढेच नाही तर, रिंगमधून ताण, स्टेप्स आणि झोप यांचाही मागोवा घेता येतो. Samsung च्या हायटेक रिंगचे वजन 2.3 ग्रॅम आहे. ही रिंग वेगवेगळ्या आकारात येते.
ही स्मार्ट रिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने शारीरिक फिटनेस आणि ऍक्टिव्हिटीजशी संबंधित प्रत्येक डिटेल देते. यासह, वापरकर्ते त्यांच्या आरोग्याची आणि फिटनेसची चांगली काळजी घेऊ शकतात. ते Galaxy companion ॲपवरून ऍक्सेस करता येईल. सविस्तर डिटेल्ससाठी samsung.com अधिकृत साईटला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
Samsung ने गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये Samsung Galaxy S24 FE भारतीय बाजारात लाँच केला होता. या डिव्हाइसची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये इतकी आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्राथमिक, 12MP अल्ट्रा वाइड आणि 8MP टेलिफोटो लेन्स आहे. आकर्षक सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 10MP कॅमेरा आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे.