KDDI आणि Samsung ने जापान च्या बेसबॉल स्टेडियम मध्ये 5G ची ट्रायल पुर्ण केली आहे. दोन्ही कंपन्यांनी 5G टॅबलेट वर यशस्वीपणे 4K वीडियो डाउनलोड आणि स्ट्रीम केले आहे. ही ट्रायल Okinawa Cellular Stadium मध्ये करण्यात आली.
Samsung च्या बीम फोर्मिंग टेक्निक वाल्या 5G एक्सेस यूनिटला फील्ड च्या बाहेर एका लाइट टावर वर इंस्टाल करण्यात आले. कंपनी ने सांगितले की, “या यशानंतर जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जसे की इंटरनेशनल कांफ्रेंस आणि म्यूजिक कॉन्सर्ट्स मध्ये 5G आणि अल्ट्रा-हाई फ्रीक्वेंसी स्पेक्ट्रम च्या माध्यमातून नवीन अनुभव बघायला मिळतील."
डिसेंबर 2017 मध्ये टोकियो मध्ये Samsung आणि KDDI ने हाई-स्पीड ट्रेन मध्ये 1.7Gbps ची डाउनलोड स्पीड मिळवला होता. Samsung चा नेटवर्क बिजनेस 5G च्या टेक्निक च्या बाबतित ग्लोबल टेल्कोज सोबत काम करत आहे. फेब्रुवारी मध्ये, कंपनी ने Verizon आणि KT मध्ये टॅबलेट्स च्या माध्यामातून एका 5G वीडियो कॉल ची चाचणी केली होती. फेब्रुवारी मध्येच कंपनी ने रोमानिया मध्ये फ्रेंच टेल्को ऑरेंज सोबत 5G फिक्स्ड वायरलेस ची ट्रायल केली होती. ही युरोपातील पहिला मल्टी-वेंडर एनवायरनमेंट कस्टमर ट्रायल होती. ऑरेंज संपूर्ण जगात 29 देशांमध्ये काम करत आहे आणि ग्राहकांच्या आधारावर रोमानिया मध्ये सर्वात मोठी टेल्को कंपनी आहे.