‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट लवकरच OTT वर रिलीज होणार! तोटा कमी करण्यासाठी निर्मात्यांची नवी योजना
'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट लवकरच OTT वर रिलीज होणार
'रक्षा बंधन' आणि 'राम सेतू' अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
अक्षयच्या 'सेल्फी' चित्रपटांचीही चाहत्यांना प्रतीक्षा
अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी दाखवू शकला नाही. त्याबरोबरच, अनेक सर्किट्समध्ये चित्रपटाचे शो देखील रद्द करावे लागले आहेत. आता असे वृत्त आहे की, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी निर्माते हा चित्रपट शक्य तितक्या लवकर OTT वर प्रदर्शित करतील. मात्र, हा चित्रपट कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
पृथ्वीराज लवकरच OTT वर प्रदर्शित होणार
अक्षय कुमारच्या या मेगा बजेट चित्रपटात VFX चा वापर करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत सुमारे 200 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. बॉलीवूड हंगामामधील वृत्तानुसार, बच्चन पांडे नंतर अक्षय कुमारचा हा दुसरा फ्लॉप चित्रपट आहे. म्हणून तोटा भरून काढण्यासाठी निर्माते आता लवकरात लवकर OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट आणण्याचा विचार करत आहेत.
हे सुद्धा वाचा : Airtelच्या 'या' 2 प्लॅन्समुळे युजर्स झाले खुश, Jio-Viकडे देखील असा रिचार्ज प्लॅन नाही
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
पृथ्वीराजनंतर अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट रिलीज होणार आहे, ज्यामध्ये त्याने आनंद एल रायसोबत काम केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यानंतर, चाहते अक्षय कुमारच्या 'राम सेतू' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये तो नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे.
अक्षयकडे चित्रपटांची कमतरता नाही
अक्षय कुमारच्या अभिनेता इमरान हाश्मीसोबतच्या 'सेल्फी' चित्रपटाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याव्यतिरिक्त, अक्षय कुमारने साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा रिमेकही साइन केला आहे. मात्र, यासाठी अद्याप हिंदी नाव निश्चित झालेले नाही. 'स्टार्टअप' या नावाने चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile