Big Boss OTT : चाहत्यांसाठी खुशखबर! सिझन 2 होस्ट करणार सलमान खान ? नव्या प्रोमोमध्ये खुलासा
Big Boss OTT च्या दुसऱ्या सिझनची घोषणा
दुसरा सिझन टीव्ही प्रमाणेच सलमान खान होस्ट करणार
अभिनेत्याची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी त्याला बिग बॉस 2 साठी देखील नियुक्त केले.
'Big Boss OTT' लोकप्रिय वादग्रस्त शोचा पहिला सिझन खूप लोकप्रिय झाला होता. पहिला सिझन प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांनी होस्ट केला होता. पहिल्या सीझनच्या यशानंतर आता निर्माते शोचा दुसरा सीझन घेऊन येत आहेत. शोचा दुसरा सीझन पूर्वीपेक्षा बोल्ड असणार आहे, अशी देखील माहिती मिळाली आहे.
अलीकडेच बातमी आली होती की, करण जोहरऐवजी सलमान खान 'बिग बॉस'चा हा नवीन सीझन होस्ट करणार आहे. शोमध्ये सलमान आता OTT स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. आता नव्या प्रोमोमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
'बिग बॉस OTT 2' चा प्रोमो
#SalmanKhan d host iz back vt #BiggBossOTT2. The promo iz here.. pic.twitter.com/dbhSnO8tqD
— Being kundan Singh. (@KundanS95006041) May 25, 2023
आता नुकताच 'बिग बॉस OTT 2' चा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानने दबंग स्टाईलमध्ये शोची घोषणा केली आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये स्ट्रीमिंग पार्टनरही जाहीर झाले आहेत. या प्रोमोमध्ये भाईजानच्या चाहत्यांना तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत असल्याची पुष्टी करताना दिसतोय.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान त्याच्या बिग बॉस या वादग्रस्त शोमुळे नेहमीच चर्चेत असतो. बिग बॉस सलमान शिवाय अपूर्ण आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण, सलमान खान आता बिग बॉस OTT चाही भाग बनणार आहे. अभिनेत्याची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी त्याला बिग बॉस 2 साठी देखील नियुक्त केले, अशी माहिती मिळाली आहे.
JioCinema वर होणार स्ट्रीम
वृत्तानुसार, यावेळी बिग बॉस OTT Voot वर नव्हे तर जिओ सिनेमावर स्ट्रीम केला जाईल. IPL नंतर आता पुन्हा एकदा बिग बॉस शोमुळे चाहत्यांना OTT वर मसाला पाहायला मिळणार आहे. व्हायरल प्रोमोमध्ये, सुपरस्टार म्हणतो, "क्रिकेटनंतर काय ?, 24 तास मनोरंजन फक्त जिओ सिनेमावर आहे. मी बिग बॉस ओटीटी घेऊन येत आहो." या घोषणेनंतर सोशल मीडियावर या प्रोमोवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile