Oscars : ‘RRR’ चित्रपट ऑस्कर रेसमध्ये सामील? निर्मात्यांनी सोशल मीडियावर केली घोषणा

Oscars : ‘RRR’ चित्रपट ऑस्कर रेसमध्ये सामील? निर्मात्यांनी सोशल मीडियावर केली घोषणा
HIGHLIGHTS

Oscars साठी RRR चित्रपटाच्या टीमने केला अर्ज

निर्मात्यांनी सोशल मीडियाद्वारे केली घोषणा

भारताकडून 'द लास्ट शो' चित्रपट स्पर्धक

अभिनेता ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर चित्रपट RRRचा जलवा अजूनही सुरूच आहे. देशानंतर आता परदेशातही RRRचा दम दिसून येत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर ऑस्करशी संबंधित एक घोषणा केली आहे. आरआरआर मेकर्सने ऑस्करसाठी अर्ज केला आहे.

हे सुद्धा वाचा : Nokia G11 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम फीचर्स

 RRR च्या निर्मात्यांनी ऑस्करसाठी वैयक्तिक श्रेणींमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आहे, ज्याची अधिकृत माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे. या बातमीने आरआरआर आणि राजामौलीचे चाहते खूप खूश आहेत. सोशल मीडियावर आरआरआरच्या अधिकृत अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. ही बातमी समोर आल्याने राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचे चाहतेही खूश आहेत. 

 त्यांना आशा आहे की, पुढची बातमी चित्रपटाच्या बाजूने येईल. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत RRR टीमने लिहिले की, "RRR ने जगभरात यश मिळवले आहे आणि भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेले आहे,  याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सर्वसाधारण श्रेणीतील ऑस्करसाठी अर्ज केला आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

विशेष म्हणजे आरआरआरने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. या चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्टचा कॅमिओही दिसला होता. एका अहवालानुसार, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 274.31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाचे कलेक्शन एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. याआधी एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटानेही जागतिक ताकद दाखवली होती. 

भारताकडून 'द लास्ट शो' चित्रपट स्पर्धक

 काही काळापूर्वी ऑस्करला RRR आणि The Kashmir Files पाठवण्याबद्दल खूप चर्चा झाली होती. मात्र, या दोन्ही चित्रपटांवर 'द लास्ट शो' या गुजराती चित्रपटाने बाजी मारली. मात्र, चित्रपट मंडळाच्या या निर्णयामुळे ‘आरआरआर’चे निर्माते चांगलेच दु:खी झाले असून ते यामुळे नाराज असल्याचेही बोलले जात आहे. RRR निर्मात्यांनी सांगितले की, त्यांच्या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट ऑस्करसाठी मजबूत नाव ठरू शकला असता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo