रिलायंस जियो ने एकदा पुन्हा JioFi Exchange Offer सादर केली आहे, या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमचा जुन्या नॉन-जियोफाई हॉटस्पॉट डिवाइस नवीन JioFi मॉडल शी एक्सचेंज करू शकता. पण कंपनी ने हा डिवाइस लिमिटेड पीरियड साठी सादर केला आहे. या एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त कंपनी कडून तुम्हाला Rs 2,200 चा इंस्टेंट कॅशबॅक पण मिळत आहे. हा कॅशबॅक तुम्हाला Rs 50 च्या वाउचर मधून मिळेल, जे तुमच्या MyJio अकाउंट मध्ये क्रेडिट होतील.
जसे की आपल्याला माहीत आहे की ही कंपनी ने काही काळासाठी जारी केलेली स्कीम आहे, त्यामुळे या स्कीम चा लाभ घेऊ न शकणार्या यूजर्स साठी ही निराशाजनक बाब ठरू शकते.
कंपनी ने या स्कीम साठी काही स्टेप्स जारी केल्या आहेत, सर्वात आधी कोणत्याही यूजरला एक JioFi hotspot डिवाइस विकत घ्यावा लागेल, त्यांना हा Rs 999 च्या किंमतीत मिळेल, याबरोबर तुम्हाला एक नवीन Jio 4g सिम पण मिळेल, जो तुम्ही Rs 198 किंवा Rs 299 च्या प्लान सह एक्टिवेट करू शकता. विशेष म्हणजे यासोबत तुम्हाला Rs 99 च्या किंमतीचा जियोप्राइम सब्सक्रिप्शन पण मिळणार आहे.
तुमचा सिम एक्टिवेट होताच, तुम्हाला एक जियोस्टोर किंवा रिलायंस डिजिटल स्टोर वर जावे लागेल, सोबत तुमचा जुना नॉन-जियो हॉटस्पॉट पण घेऊन जा, त्याचबरोबर तुम्हाला या डिवाइस चा सीरियल नंबर, MSISDN नंबर द्यावा लागेल.
तुम्ही हा जुना डिवाइस सबमिट करताच कॅशबॅक तुमच्या MyJio अकाउंट मध्ये आपोआप क्रेडिट होईल. जसे की मी आधीच सांगितले आहे की हा कॅशबॅक तुम्हाला Rs 50 च्या 44 वाउचर च्या रुपात मिळेल आणि तो वापरण्यासाठी तुम्हाला Rs 198 किंवा Rs 299 चा रिचार्ज करावा लागेल.
अजून एक सांगायचे म्हणजे असाच कॅशबॅक तुम्हाला 4G स्मार्टफोंस सोबत मिळत आहे, त्यामुळे हा मिळत असलेला कॅशबॅक काही सरप्राइज म्हणता येणार नाही.