रिलायन्स JIOने भारतात आपले ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस JioTag लाँच केले आहे. हे प्रोडक्ट Apple AirTag ला चांगलीच स्पर्धा देणार आहे, अशी चर्चा टेक विश्वात सुरु आहे. याचा वापर गोष्टींचा मागोवा म्हणजेच ट्रॅक करण्यासाठी केला जाईल. हे डिवाइस ब्लूटूथद्वारे ट्रॅकिंग करेल. बघुयात किंमत आणि फीचर्स-
JioTagची किमंत Apple AirTag पेक्षा खूप स्वस्त आहे. कंपनीने आपले ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस JioTag केवळ 749 रुपयांमध्ये लाँच केले आहे. हे उपकरण जिओच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. या डिवाइसची MRP 2,199 रुपये आहे.
जिओटॅगचा वापर हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी करता येईल. जिओ बॉक्समध्ये अतिरिक्त बॅटरी आणि डोरी केबल आहे. याद्वारे युजर्स त्यांच्या वस्तूंशी JioTag सहज कनेक्ट करू शकतात. यात रिमूव्हेबल CR2032 बॅटरी दिली गेली आहे, जी एका वर्षापर्यंत बॅकअप देते. त्याची रेंज इनडोअरसाठी 20 मीटर आणि आऊटडोअरसाठी 50 मीटरपर्यंत आहे.
तुम्ही तुमची कोणतीही वस्तू विसरल्यास, JioTag तुम्हाला अलर्ट करेल की तुम्ही तुमचे पाकीट, चाव्या किंवा इतर कोणतीही वस्तू मागे ठेवली आहे. तसेच, याद्वारे हरवलेल्या वस्तूंची लोकेशन देखील कळेल.
JioTag मध्ये कम्युनिटी फाइंड फीचर देण्यात आले आहे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी आपले सामान विसरून आलात नंतर त्या ठिकाणी ते डिवाइस मिळत नाही आहे, ते JioThings ऍपवर शोधून त्यांचा JioTag शोधू शकतात. हे ऍप Google Play Store आणि Apple App Store यावरून डाउनलोड करता येईल.