Reliance Jio ने नुकतीच एक इंटरनेशनल रोमिंग सर्विस सुरु केली आहे. हि सर्विस सुरु केल्यानंतर रिलायंस जियो टेलीकॉम इंडस्ट्री मधील पहिला असा ब्रँड बनली आहे ज्याने हि सेवा सुरु केली आहे.
Reliance Jio ने मंगळवारी VoLTE आधारित इंटरनेशनल रोमिंग सर्विसची सुरवात केली आहे. हि इंटरनेशनल रोमिंग सर्विस भारत आणि जापान दरम्यान सुरु करण्यात आली आहे. टेलीकॉम इंडस्ट्री ने सांगितले आहे कि ते पहिले असे टेलीकॉम ऑपरेटर आहेत जे देशात Voice Over LTE ची सेवा आहेत. जियो कडून आलेल्या एका विधानानुसार जापान-आधारित KDDI कॉर्पोरेशन पहिला असा इंटरनेशनल मोबाईल सर्विस प्रोवाइडर आहे ज्याला जियोची VoLTE कॉलिंग आणि LTE डेटा इंटरनेशनल रोमिंग सर्विस मिळत आहे.
विशेष म्हणजे या इंटरनेशनल रोमिंग सर्विस च्या माध्यमातून इंटरनेशनल ट्रैवेलर्स हाई-स्पीड डेटा आणि वॉइस सर्विस जियोच्या सर्व IP, 4G एक्सक्ल्यूसिव नेटवर्क एक्सेस करू शकतात. तसेच जियोचे म्हणणे आहे कि कंपनी कडून याबाबतीती करण्यात आलेली अरेंजमेंट इंटरनेशनल ट्रॅव्हलर्सना जियोच्या सर्व IP नेटवर्कचा एक चांगला एक्सपीरियंस देईल.
जियो टीम च्या मधून Mark Yarkosky ने सांगितले कि भारत आणि भारतात येणारे सर्व यूजर्सना Reliance Jio सर्वोत्तम डेटा आणि वॉइस एक्सपीरियंस दे इच्छिते. तसेच कंपनी भारतात KDDI कस्टमर्सचे जियोच्या पहिल्या इंटरनेशनल VoLTE आणि HD रोमिंग यूजर्सच्या रूपात स्वागत करत आहे. विशेष म्हणजे Reliance Jio जागतिक 9वी सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर आहे जिचे आतापर्यंत 252 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.