ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहून आता विविध प्रकारचे AI टूल्स बाजारात लाँच केले जात आहेत. गुगलच्या बार्डनंतर आता भारत स्वतःची AI प्रणाली लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता रिलायन्स JIO ने ChatGPT शी स्पर्धा करण्याची अगदी मोठी तयारी केली आहे. ताज्या अहवालानुसार, रिलायन्स JIO इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी ‘Bharat GPT’ प्रोग्रामची घोषणा केली आहे. BharatGPT बाजारात ChatGPT शी जबरदस्त स्पर्धा करेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा: Good News! लेटेस्ट OnePlus Nord 3 5G फोन झाला 4,000 रुपयांनी स्वस्त, नवीन किंमत साइटवर Live। Tech News
वर सांगितल्याप्रमाणे, रिलायन्स JIO इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी IIT-B सुरू केलेल्या टेकफेस्ट दरम्यान ‘ Bharat GPT’ ची घोषणा केली आहे. हे AI चॅटबॉट मार्केटमध्ये ChatGPT शी स्पर्धा करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी रिलायन्स Jio ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बेशी हातमिळवणी केली आहे.
दरम्यान, रिलायन्स Jio आणि IIT बॉम्बे संयुक्तपणे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल विकसित करतील, जे भारतात GPT म्हणून सादर केले जाईल. सध्या तरी Bharat GPT एवढीच माहिती देण्यात आलेली आहे. हे AI टूल कसे कार्य करेल यासंबंधी इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. पण लवकरच याबाबत अधिकृत माहिती पुढे येईल, अशी अपेक्षा आहे.
थोडक्यात ChatGPT बद्दल बोलायचे झाल्यास, ओपन AI ही अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च फर्म आहे, जी नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच झाली. हा एक AI चॅटबॉट आहे, जो वापरकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहज देतो. सर्वांना माहितीच आहे की, जेव्हा तुम्ही Google ला कोणताही प्रश्न विचारता तेव्हा ते तुम्हाला त्याचे परिणाम म्हणून अनेक लिंक्स सादर करते. मात्र, ChatGPT तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देते. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ChatGPT चा प्रतिसाद चॅट स्वरूपात मिळतो.