सध्या भागेदारीत Yono (यू ऑनली नीड वन) च्या माध्यमातून सर्विस देण्यात येईल, जो SBI ने सादर केलेला एक डिजिटल बँकिंग अॅप आहे.
रिलायंस जियो आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ने डिजिटल बँकिंग, कॉमर्स आणि फाइनेंशियल सर्विसेज देण्यासाठी हाथ मिळवणी केली आहे. Reliance Jio आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांची आधीच 70:30 रेशियो असलेली संयुक्त एंटरप्राइज आहे. सध्या यातून Yono (यू ऑनली नीड वन) च्या माध्यमातून सर्विस देण्यात येईल, जो SBI ने सादर केलेला एक डिजिटल बँकिंग अॅप आहे.
एका प्रेस स्टेटमेंट मध्ये RIL ने सांगितले आहे की, Yono चे डिजिटल बँकिंग फीचर्स आणि सोल्यूशंस मायजियो अॅप मध्ये इनेबल केले जातील आणि जियो प्राइम यूजर्सना रिलायंस रिटेल, जियो, पार्टनर ब्रँड्स आणि मर्चंट्स कडून खास डील्स पण दिल्या जातील.
RIL चे चेयरमेन मुकेश अंबानी यांनी सांगितले, “SBI चा कस्टमर बेस ग्लोबली खुप चांगला आहे. जियो रिटेल इकोसिस्टम सोबत असलेल्या प्लॅटफॉर्म्स आणि सुपीरियर नेटवर्क चा वापर करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.”
दुसरीकडे SBI चे म्हणणे आहे की, “SBI डिजाइनिंग, नेटवर्क तसेच कनेक्टिविटी सोल्यूशंस साठी जियो ला आपला प्रीफर्ड पार्टनर्स म्हणून एंगेज करेल.”