रिलायंस यासोबत काही अटींवर HD HEVC सेट-टॉप बॉक्स पण फ्री मध्ये देत आहे.
आता पर्यंत टेलीकॉम बाजारात स्वस्त डाटा पॅक्स चे युद्ध चालू होत. पण आता अस वाटत आहे की भारतीय सॅटेलाइट केबल इंडस्ट्री मध्ये असच काहीसं होणार आहे. कारण रिलायंस बिग टीवी आता एका नव्या ऑफर सह समोर आली आहे. आता या ऑफर अंतर्गत कंपनी च्या ग्राहक सर्व चॅनल्स पुढच्या एक वर्षासाठी फ्री मध्ये वापरू शकतील. तसेच ग्राहक फ्री टू एयर चॅनल्स पुढच्या 5 वर्षांपर्यंत फ्री मध्ये वापरू शकतील. रिलायंस यासोबत काही अटींवर HD HEVC सेट-टॉप बॉक्स पण फ्री मध्ये देत आहे. याची प्री-बुकिंग 1 मार्च 2018 ला सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. ही काही वेळा साठी चालू असेल.
ग्राहकाला बुकिंग च्या वेळेस Rs. 500 द्यावे लागतील. नंतर इंस्टालेशन च्या वेळेस Rs 1500 द्यावे लागतील. एक वर्षानंतर पेड चॅनल बघण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला Rs 300 चा रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज तुम्हाला प्रत्येक महिन्याला करावा लागेल. 2 वर्षापर्यंत असे केल्या नंतर तुम्हाला Rs. 2,000 रिफंड केले जातील.