Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G भारतात लाँच, किंमत 10,999 रुपयांपासून सुरू

Updated on 29-Jul-2024
HIGHLIGHTS

Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G आज सोमवारी भारतात लाँच

कंपनीने Redmi Pad Pro टॅबलेट Wi-Fi आणि 5G मॉडेलमध्ये सादर केला आहे.

या टॅबलेटवर HDFC आणि ICICI बँक कार्डद्वारे टॅबवर 2000 रुपयांची सूट

गेल्या अनेक दिवसांपासून Redmi च्या दोन उपकरणांच्या लाँचची चर्चा सुरु होती. अखेर Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G आज सोमवारी भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे Xiaomi चे दोन नवीनतम टॅब्लेट आहेत. Redmi Pad SE टॅब भारतात एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आता कंपनीने भारतात आपले 4G मॉडेल आणले आहे. हे दोन्ही टॅब वेगवेगळ्या किंमतींमध्ये सादर करण्यात आले आहेत. SE मॉडेल बजेट श्रेणी टॅब आहे, तर प्रो मॉडेल कंपनीच्या प्रीमियम टॅब मालिकेचा भाग आहे. जाणून घेऊयात Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G ची किंमत-

Also Read: लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme Narzo N61 भारतात लाँच, किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी

Redmi Pad Pro 5G ची भारतीय किंमत

कंपनीने Redmi Pad Pro टॅबलेट Wi-Fi आणि 5G मॉडेलमध्ये सादर केला आहे. या टॅबच्या Wi-Fi मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. ही किंमत टॅबच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. तर, 5G च्या 8GB रॅम आणि 128GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. टॅबलेटच्या सिंगल 8GB रॅम आणि 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे.

लाँच ऑफर अंतर्गत या टॅबलेटवर HDFC आणि ICICI बँक कार्डद्वारे टॅबवर 2000 रुपयांची सूट मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबची विक्री 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट, Amazon India आणि Xiaomi वर सुरू होईल.

Redmi Pad SE 4G ची भारतीय किंमत

Redmi Pad SE 4G चा 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांच्या किमतीत ऑफर करण्यात आला आहे. या टॅबलेटचे 4GB+128GB स्टोरेज मॉडेल 11,999 रुपयांना येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, टॅबलेटच्या कव्हरची किंमत 999 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत, तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे टॅबवर 1000 रुपयांची सूट मिळेल. या टॅबची विक्री 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart, mi.com आणि Xiaomi वर सुरू होईल.

Redmi Pad Pro 5G चे तपशील

या टॅबमध्ये 12.1 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा टॅब Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. तर, तुम्ही या टॅबचे स्टोरेज 1.5TB पर्यंत वाढवण्यास सक्षम असाल. टॅबमध्ये 8MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. टॅबची बॅटरी 10,000mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. ऑडिओसाठी टॅबमध्ये डॉल्बी ATMOS सपोर्टसह क्वाड स्पीकर देण्यात आले आहेत.

Redmi Pad SE 4G चे तपशील

Redmi Pad SE 4G मध्ये 8.7-इंच लांबीचा HD LCD डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. याशिवाय, हा टॅब MediaTek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच, या टॅबची स्टोरेज तुम्ही 2TB पर्यंत वाढवू शकता. या टॅबमध्ये 8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. पॉवरसाठी, या टॅबची बॅटरी 6,650mAh आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :