Price Cut! कंपनीने Redmi Pad च्या किमतीत केली घट, जाणून घ्या 10 इंच स्क्रीन टॅबलेटची नवी किंमत। Tech News
कंपनीने आपल्या Redmi Pad च्या किंमतीत कपात केली आहे.
रेडमी पॅडची किंमत 2,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
हा टॅबलेट डिव्हाइस ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारात नवीन किमतीत खरेदी करता येईल.
Xiaomi ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक आकर्षक घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या स्वस्त टॅबलेटच्या किमतीत कपात केली आहे. होय, कंपनीने आपल्या Redmi Pad च्या किंमतीत कपात केली आहे. रेडमी पॅडची किंमत 2,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हा टॅबलेट तुम्ही आजपासून ते नवीन आणि स्वस्त किमतीत खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात रेडमी पॅडची किंमत आणि सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: आगामी Vivo V30e चे भारतीय लाँच कन्फर्म! रियर आणि फ्रंट दोन्हीकडे मिळेल 50MP कॅमेरा आणि बरेच अप्रतिम फीचर्स। Tech News
Redmi Pad ची नवी किंमत
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Redmi Pad ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. फोनच्या 4GB रॅम वेरिएंटची किंमत आधी 14,999 रुपये होती. कपातीनंतर हा व्हेरिएंट 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, Redmi Pad च्या 6GB RAM मॉडेलची किंमत 16,999 रुपये इतकी होती. मात्र, कपातीनंतर हा व्हेरिएंट 14,999 रुपयांना खरेदी करता येईल.
उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा टॅबलेट डिव्हाइस ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारात नवीन किमतीत खरेदी करता येईल. रेडमी पॅड भारतात ग्रेफाइट ग्रे, मिंट ग्रीन आणि मूनलाईट सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही Xiaomi च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
Redmi Pad चे फीचर्स आणि स्पेक्स
Redmi पॅड टॅबलेटमध्ये 10.61-इंच लांबीच 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन IPS LCD पॅनेलवर तयार केली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटसह कार्य करते. सुरळीत कामकाजासाठी या टॅबमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, Xiaomi Redmi Pad मध्ये मागील पॅनलवर 8MP चा रिअर कॅमेरा आणि फ्रंट पॅनलवर 8MP चा सेल्फी सेन्सर आहे. तर, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिवाइस 8000mAh बॅटरीसह येतो, जी 18W जलद चार्जिंग तंत्रज्ञानासह कार्य करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile