Redmi Pad 4G भारतात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, त्यांचा पुढील टॅबलेट भारतात 4 ऑक्टोबर रोजी लाँच होईल. आगामी टॅबलेट 4G प्रोसेसरसह Redmi Pad 5G चे ट्रिम-डाउन वर्जन असू शकते. 91Mobiles च्या मते, Redmi Pad 4G मध्ये MediaTek प्रोसेसर आणि 8000mAh बॅटरी वापरता येऊ शकते. ज्यामुळे ते बजेट टॅबलेट मार्केटमध्ये एक मजबूत प्रतिस्पर्धी बनणार आहे.
हे सुद्धा वाचा : JioPhone 5G चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच आले समोर, मिळतील उत्तम फीचर्स
आगामी Redmi Pad 4G हा लो व्हिज्युअल फेटग सर्टिफिकेशनसह जगातील पहिला टॅबलेट असण्याची शक्यता आहे. जो आगामी टॅबलेट डिस्प्ले आय प्रोटेक्शनसह येईल, याचा पुरावा आहे. Redmi Pad 4G च्या इमेजेस मेटल सारखी बॉडी दर्शवितात, तर लॉन्चच्या आधी कलर आणि फीचर्स देखील उघड झाले आहेत, ज्याची पुष्टी होणे बाकी आहे.
रिपोर्टनुसार, Redmi Pad 4G हा MediaTek Helio G99 प्रोसेसरसह लो-एंड पर्याय असेल. हा प्रोसेसर पूर्वी Poco M5 आणि Infinix Note 12 Pro 4G वर वापरला होता आणि त्याची कामगिरी उत्तम दिसून आली आहे. टॅबलेट 2K रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 10.61-इंच LCD डिस्प्लेसह येण्याची अपेक्षा आहे. डिस्प्ले 400 निट्स पीक ब्राइटनेस आणि 1500:1 च्या कॉन्ट्रास्ट रेशोला सपोर्ट करू शकतो. Redmi Pad 4G ग्रे, सिल्व्हर आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Redmi Pad 4G 3GB आणि 4GB रॅम पर्यायांसह 128GB अंतर्गत इंटर्नलसाठी सपोर्टसह येऊ शकतो. टॅबलेट स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्डला सपोर्ट करू शकतो. Redmi Pad 4G ची जाडी 7.05mm आणि वजन 445 ग्रॅम असू शकते. हे फीचर्ससह Android 12-आधारित MIUI 13 चालवू शकते. Redmi Pad 4G मध्ये, तुम्हाला 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8000mAh बॅटरी मिळू शकते. टॅब्लेट 22.5W चार्जरसह येऊ शकतो. टॅब्लेट प्रामुख्याने मीडिया वापरासाठी वापरल्या जात असल्याने, Redmi Pad 4G डॉल्बी ATMOS -ट्यून क्वाड स्पीकर्ससह येऊ शकतो. यात समोर आणि मागे दोन्ही बाजूस 8-मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो.