रियलटेक ला COMPUTEX 2018 मध्ये तीन बेस्ट चॉइस अवार्ड्स मिळाले

रियलटेक ला COMPUTEX 2018 मध्ये तीन बेस्ट चॉइस अवार्ड्स मिळाले
HIGHLIGHTS

रियलटेक च्या एसओसी, म्हणजे फार-फील्ड स्पीच रिकोग्निशन चिप, ब्लूटूथ 5.0 लो एनर्जी एसओसी आणि वाई-फाई आईपी कॅमेरा एसओसी ने पुरस्कार पटकावले.

रियलटेक सेमीकंडक्टर कॉर्प, एक अंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि मल्टीमीडिया आईसी प्रदाता, ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली की रियलटेक ने कॉम्पटेक्स टीएपीईआई 2018 मध्ये तीन सर्वश्रेष्ठ चॉइस अवॉर्ड्स जिंकले आहेत, ज्यात बेस्ट चॉइस गोल्डन अवॉर्ड पण आहे. 

मल्टी-माइक फार-फील्ड स्पीच रिकोग्निशन एन्हांस्ड सिंगल चिप सॉल्यूशन (एएलसी 5520) ने 2018 कॉम्पटेक्स बेस्ट चॉइस गोल्डन अवॉर्ड मिळवला. रियलटेक चे ऑडियो / वॉयस डीएसपी फार-फील्ड वॉयस एप्लीकेशन चे उत्तर आहे. एम्बेडेड 103 डीबी एसएनआर हाय-फाई, कम पावर एडीसी, वीएफपीयू सह मल्टी-कोर 32-बिट डीएसपी चे एकीकरण आणि रीयलटेक प्रोप्रायटरी वॉयस प्रोसेसिंग टेक्नोलॉजी चे लक्ष्य एएलसी5520 ची स्पीच रेकोग्निशन परफॉरमेंस वाढवणे आहे. हे ALC5520 स्मार्ट स्पीकर, स्मार्ट टीवी, मोबाइल डिवाइस, वाइट गुड्स आणि ऑटोमोटिव इलेक्ट्रॉनिक्स सारख्या प्रोडक्ट्स ना एडोप्शन उपयुक्त बनवतात. 

यासोबत, रियलटेक ब्लूटूथ 5.0 लो एनर्जी एसओसी (आरटीएल 8762C) आणि वाई-फाई आईपी कॅमेरा एसओसी (आरटीएल 8715 ए) ने 2018 कॉम्पटेक्स बेस्ट चॉइस कॅटेगरी अवाॅर्ड मिळवला. रीयलटेक नुसार, आरटीएल 8762C बाजारात उपलब्ध असलेली सर्वात कमी वीज वापरणारी बीएलई एसओसी आहे. याचा वापर ब्लूटूथ रिमोट कंट्रोल, ब्लूटूथ wristbands, आणि आईओटी उपकरणांमध्ये करता येईल. हा एका एकीकृत वॉयस प्रोसेसिंग यूनिट सह येतो आणि नवीन ब्लूटूथ 5.0 स्पेसिफिकेशन ला सपोर्ट करून ऑटो-पेयरिंग ला पण सपोर्ट करतो.

रीयलटेक नुसार वाई-फाई आईपी कॅमेरा एसओसी (आरटीएल 8715 ए) जगातील पहिली अल्ट्रा-लो-पावर, अत्याधुनिक एकीकृत वायरलेस नेटवर्क कॅमेरा एसओसी आहे. आरटीएल 8715 ए एका चिप मध्ये एच 264 एन्कोडर / आईएसपी / वाई-फाई / ऑडियो कोडेक / पीएमयू कामांना एकत्रित करतो. यात अल्ट्रा-लो पावर वापर, सर्वात छोटा आकार, फास्ट सिस्टम बूट अप, प्रगत ट्रस्ट-जोन आणि सुरक्षित बूट सिस्टम सुरक्षा यांचा समावेश आहे. 
रियलटेक चे उपाध्यक्ष आणि प्रवक्ता, Yee-Wei Huang ने सांगितले, "आम्हाला COMPUTEX 2018 मध्ये 3 बेस्ट चॉइस अवॉर्ड्स नी सम्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार मोबाइल आणि एआई आवाज एप्लीकेशन सिरीज मधील आमच्या प्रोडक्ट्स च्या ताकदीचे प्रदर्शन करतात आणि प्रगत टेक्नोलॉजी मधील आमचे नेतृत्व मजबूत करतील."
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo