जबरदस्त फीचर्ससह Realme Pad X टॅब लाँच, 8360mAh बॅटरीसह मिळेल 6GB RAM

जबरदस्त फीचर्ससह Realme Pad X टॅब लाँच, 8360mAh बॅटरीसह मिळेल 6GB RAM
HIGHLIGHTS

जबरदस्त फीचर्ससह मिड-रेंज Realme Pad X टॅब लाँच

टॅबची सुरुवातीची किंमत जवळपास 15,000 रुपये

कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर Realme Pad X साठी प्री-रिझर्वेशन सुरू

Realme ने गेल्या वर्षी टॅबलेट सेगमेंटमध्ये आपला पहिला टॅबलेट लाँच केला, ज्याला Realme Pad म्हणतात. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने नवीन Realme Pad Mini ची घोषणा केली. त्यानंतर आता ब्रँडने Realme Pad X सादर केला आहे. Realme Pad X हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 सिरीज चिपसेट, 2K डिस्प्ले आणि फास्ट  चार्जिंगसह येईल. Realmeने मिड-रेंज टॅबलेट म्हणून Realme Pad X  केला आहे. कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर Realme Pad X साठी प्री-रिझर्वेशन देखील सुरू झाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात  Realme Pad X ची किंमत, फीचर्स आणि इतर स्पेसिफिकेशन्स…

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :

Realme Pad X 11-इंच 2K रिझोल्यूशन आणि 60Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हे एक LCD पॅनल आहे ज्यात हार्डवेअर लेव्हल अँटीब्लु- लाईट फिचर आहे. डिस्प्ले 5:3 ऑस्पेक्ट रेशियो, 2000×1200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 450 nits ब्राइटनेससह येतो. टॅबलेट 6GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. हा डिवाइस 512GB पर्यंत मायक्रो SD कार्डला देखील सपोर्ट करतो.
याशिवाय, Realme Pad Xमध्ये 8340mAh बॅटरी युनिट आहे, जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. त्याबरोबरच, यात व्हिडिओ कॉलसाठी 13MP रिअर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे, ज्यामध्ये 105° वाइड-एंगल लेन्स आणि पोर्ट्रेट सेंटरिंग फंक्शन आहे.
टॅबलेट स्टायलस इनपुटला देखील सपोर्ट करतो आणि रियलमी याला रियलमी पेन सपोर्ट असे म्हणतो. हा 4096 लेवल सेन्सिटिव्हिटीसह येतो. हा डिवाइस डॉल्बी ऍटमॉसच्या सपोर्टसोबत क्वाड-स्पीकर सेटअपसह येतो. टॅब्लेटची जाडी फक्त 7.1 मिमी आहे आणि त्याचे वजन 499 ग्रॅम आहे. तसेच, अन्य फीचर्समध्ये पॅडसाठी  Realme UI 3.0 वर आधारित Android 12, Hi-Res ऑडिओ सपोर्ट, Type-C पोर्ट, Wi-Fi आणि Bluetooth यांचा समावेश आहे.

 Realme Pad Xची किंमत :

Realme Pad X ची किंमत 4GB+64GB व्हेरिएंटसाठी जवळपास 15,000 रुपये आहे. त्याबरोबरच, 6GB+128GB व्हेरियंटसाठी सुरुवातीची किंमत अंदाजे 18,400 रुपये आहे. प्रारंभिक विक्रीदरम्यान, टॅबची किंमत अनुक्रमे 4GB आणि 6GB प्रकारांसाठी 13,800 रुपये आणि 17,000 रुपये इतकी असेल. पुढील आठवड्यापासून चीनमध्ये या टॅबलेटची विक्री सुरू होणार आहे. हा टॅबलेट ब्लॅक, ग्रीन आणि ब्लु अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo