Realme Pad Slim टॅबलेट लाँचपूर्वी फ्लिपकार्टवर सूचीबद्ध, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

Realme Pad Slim टॅबलेट लाँचपूर्वी फ्लिपकार्टवर सूचीबद्ध, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…
HIGHLIGHTS

Realme Pad Slim फ्लिपकार्टवर सूचीबद्ध

Realme Pad Slim ला 32,999 रुपयांना लिस्ट केले गेले आहे.

टॅबलेट MediaTek Helio G80 प्रोसेसरने सुसज्ज

Realme 9 जानेवारी रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme 10 लाँच करणार आहे. यासोबत कंपनी आपला नवीन टॅबलेट Realme Pad Slim देखील लाँच करू शकते. खरं तर, कंपनीने फ्लिपकार्टवर Realme Pad Slim ला किंमतीसह सूचीबद्ध केले आहे. त्यावर Coming Soon असे लिहिले आहे. नवीन Realme Pad Slim च्या किंमतीसोबत, स्पेसिफिकेशन माहिती देखील समोर आली आहे. पॅड स्लिम 4G LTE कनेक्टिव्हिटीसह येणार आहे. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा सपोर्ट मिळेल.

हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! OnePlus 11 5G अखेर लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये ?

Realme Pad Slim चे स्पेसिफिकेशन

Flipkart सूचीनुसार, Realme Pad Slim 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह लॉन्च केला जाईल. यात फक्त Wi- Fi आणि LTE कनेक्टिव्हिटी पर्याय मिळतील. टॅबलेट MediaTek Helio G80 प्रोसेसरने सुसज्ज असेल. रिअलमी पॅड स्लिमला 10.4 इंच फुल HD + डिस्प्ले मिळेल. टॅबमध्ये डॉल्बी ATMOS ऑडिओला सपोर्ट असेल.

Realme Pad Slim मध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. रिअलमी पॅडमध्ये 7100mAh बॅटरी दिली जाईल, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Realme Pad Slim किंमत

Realme Pad Slim ला 32,999 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. रिअलमी पॅड स्लिमला 6 GB रॅम आणि 128 GB  स्टोरेजचा सपोर्ट मिळेल. सूचीनुसार, टॅब गोल्डन आणि ग्रे कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. हा कंपनीचा चौथा टॅबलेट असणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo