प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने आगामी Realme Pad 2 Lite टॅबलेटच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या वर्षी एप्रिलमध्ये लाँच झालेल्या Realme Pad 2 ची ही परवडणारी आवृत्ती असणार आहे. एवढेच नाही तर, कंपनीने आगामी टॅबसाठी कंपनीच्या वेबसाइटवर डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील लाइव्ह केली आहे. या वेबसाईटद्वारे, लाँचपूर्वी या टॅबची अनेक फीचर्स समोर आली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आगामी Realme Pad 2 Lite चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme India ने त्याच्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवर Realme Pad 2 Lite Tab च्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. लक्षात घ्या की, हा टॅब भारतीय बाजारात येत्या 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येणार आहे. मात्र, सध्या हे स्पष्ट नाही की, या टॅबसाठी लाँच इव्हेंट आयोजित केला जाईल की, तो थेट कंपनीच्या साइटवर सूचीबद्ध केला जाईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा टॅब Realme India आणि प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल.
वर सांगितल्याप्रमाणे, Realme Pad 2 Lite Tab नुकतेच लाँच झालेल्या Realme Pad 2 चे परवडणारे मॉडेल असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या टॅबमध्ये ड्युअल टोन डिझाइन दिले जाईल. या टॅबच्या मागील बाजूस एक सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे. ज्यामध्ये मागील कॅमेरा सेन्सर ठेवले जातील.
वरील टीझर पोस्टरमध्ये हा टॅब लॅव्हेंडर आणि डार्क ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये दिसत आहे. या टॅबमध्ये Realme Pad 2 Lite साठी 2K डिस्प्ले दिला जाणार आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. पॉवरसाठी, हा टॅब 8,300mAh बॅटरीसह नॉक करेल.
लेटेस्ट Realme टॅबलेटचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 6GB RAM सह 128GB आणि 8GB RAM सह 256GB असे फोन व्हेरिएंट मिळेल. या मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे 19,999 रुपये आणि 22,999 रुपये आहेत. Realme Pad 2 डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 11.5 इंच लांबीची स्क्रीन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Realme Pad 2 मध्ये MediaTek डायमेंसिटी G99 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या टॅबमध्ये मागील बाजूस 20MP चा कॅमेरा सेन्सर आहे, तर समोर 8MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 8360mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह येतो, जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह येईल.