आज Realme च्या अलीकडेच लाँच झालेल्या लेटेस्ट Realme Pad 2 टॅबलेटची पहिली सेल आहे. ही सेल Flipkart वर सुरू झाली आहे. टॅबलेट अतिशय आकर्षक डिझाईनसह येतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊया Realme च्या नवीनतम टॅबलेटची किंमत आणि उपलब्ध डील्स.
Realme Pad 2 चा 6GB+128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांना विकला जात आहे. त्याच वेळी, त्याचा 8GB+256GB स्टोरेज वेरिएंट 22,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
ICICI, SBI आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय टॅबवर नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे.
डिझाईन आणि डिस्प्ले
Realme Pad 2 च्या बॉडीमध्ये मेटलचा वापर करण्यात आला आहे. यात 1200 x 2000 पिक्सेल रिझोल्यूशनसह 11.5-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. पिक्चर क्लिक करण्यासाठी, पुढील आणि मागील बाजूस जबरदस्त कॅमेरे देण्यात आले आहेत.
प्रोसेसर आणि स्टोरेज
टॅबलेटमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसरसह 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजद्वारे समर्थित आहे. याची रॅम 16GB पर्यंत वाढवता येऊ शकते. MediaTek Helio G99 हा एक सक्षम गेमिंग प्रोसेसर आहे, जो स्मूथ फ्रेम रेट्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय गेम चालवू शकतो. 8GB रॅमसह अधिक मल्टीटास्किंग, फास्ट लोडिंग टाइम आणि उत्तम परफॉर्मन्स मिळेल.
बॅटरी
या टॅबलेटमध्ये मोठी 8,360mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 33W सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की तिची बॅटरी फुल चार्ज केल्यावर संगीतासह 85.7 तासांचा बॅकअप देते, तर स्टँडबाय मोडमध्ये 1347 तासांचा बॅकअप उपलब्ध आहे.
इतर तपशील
या टॅबलेटमध्ये कंटेंट सिंक आणि मल्टी-स्क्रीन सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच, टॅबमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, GPS आणि USB टाइप-C पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी स्पेक्स उपलब्ध आहेत.