Realme Pad X लवकरच भारतात येणार आहे. रियलमी इंडियाचे CEO माधव सेठ यांनी गेल्या आठवड्यात कंपनीच्या प्रीमियम टॅबलेटच्या इंडिया लाँचबाबत गोष्ट काढली होती, परंतु त्यासाठी विशिष्ट तारीख दिलेली नाही. त्यानंतर, BISची वेबसाइट सूचित करते की टॅबलेट लवकरच लाँच होईल. आता, एका नवीन अहवालात दावा केला आहे की, Realme Pad X जूनमध्ये लाँच होणार आहे. 91Mobiles ने माहिती दिली आहे की, Realme Pad X भारतात 15 जून पर्यंत लाँच होईल. Realme Pad X चे भारतीय मॉडेल 4GB आणि 6GB RAM या दोन्ही व्हेरिएंटमध्ये येईल.
अहवालात Realme Pad X च्या भारतीय किंमतीचा उल्लेख नाही. परंतु, Realme ने चीनमध्ये CNY 1,299 च्या सुरुवातीच्या किमतीत Pad X लाँच केले, जे सुमारे 15,000 रुपये आहे. रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, Realme Pad X ग्लेशियर ब्लू, रेसिंग ग्रीन आणि ग्लोइंग ग्रे या कलर ऑप्शन्ससह भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणार आहे.
Realme Pad X मध्ये 2K रिझोल्यूशनसह 11-इंच LCD, 450 nits पीक ब्राइटनेस, DC डिमिंगसाठी सपोर्ट आणि TUV रेनलँड ब्लू लाइट फिल्टर आहे. Realme Pad X मध्ये क्वाड स्पीकर आहेत आणि ते डॉल्बी ATMOS आणि हाय-रेस ऑडिओ द्वारे ट्यून केले आहेत.
Realme Pad Xमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे, जो 6GB पर्यंत RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह आहे. हा टॅबलेट फक्त WiFi आवृत्तीमध्ये येतो. यामध्ये मागील बाजूस 13-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. तसेच यामध्ये 8340mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.