रिलायन्स कम्युनिकेशन्स (Rcom) ने आपला नवीन मूव्हीनेट प्लान लाँच केला आहे, ज्यात आपल्याला मूव्हीज, म्यूझिक आणि इंटरनेटचे एक्सेस मिळणार आहे. ह्या मूव्हीनेट प्लानच्या अंतर्गत आपल्याला हंगामा प्ले ची ‘Entertainment-on-Demand’ सेवा “Any-Use Data” सह मोफत मिळणार आहे. ह्या प्लानद्वारे आपण मनोरंजनाशी संबंधित कोणत्याही कॉन्टेंटला अगदी सहजपणे मिळवू शकता, ज्याने आपले जास्तीत जास्त मनोरंजन होईल, असे ऑपरेटरने सांगितले आहे.
“ह्याचे सर्वसाधारण डिझाईन, उत्कृष्ट कॉन्टेंट आणि उत्कृष्ट डाटा अनुभव” हेच ह्या प्लानची वैशिष्ट्ये आहेत. नवीन विचारांनी बनवलेल्या ह्या प्लानच्या माध्यमातून ग्राहक डाटा आणि कॉन्टेंट मधील अंतर कमी करण्याचा आमचा उद्देश आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंग यांनी सांगितले आहे.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
Rcom ने प्रति महिना २३५ रुपयांचा हा प्रीपेड प्लान सुरु केला आहे. ह्यात “Any-Use Data” च्या अंतर्गत 2.5GB चा हायस्पीड डाटा, 1.25GB चा “Any-time Data” एक्सेस मिळणार आहे. तसेच 1.25GB नाइट डाटासुद्धा मिळणार आहे.
हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…
तसेच हा प्लान पोस्ट-पेड यूजर्ससाठीही ४५० रुपये प्रति महिना प्रमाणे उपलब्ध केला आहे. ज्यात ग्राहकांना “Entertainment-On-Demand” लायब्ररीसाठी मोफत एक्सेस करु शकतात. त्याचबरोबर यूजर्सला 3GB चा हायस्पीड डाटा आणि १००० मिनिट्स लोकल आणि STD कॉल्ससुद्धा मोफत मिळणार आहे.
हेदेखील वाचा – अॅप्पल आयफोन 7 ची आणखी काही फोटोज झाले ऑनलाइन लीक
हेदेखील वाचा – शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज