Good News! आता ATM कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही, UPI द्वारे होतील पैसे जमा, RBI ने केली घोषणा। Tech News
भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने UPI संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
सुविधेअंतर्गत लवकरच तुम्ही UPI वापरून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.
या लोकांना थर्ड पार्टी UPI ॲपद्वारे UPI पेमेंट करावे लागेल.
UPI वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, UPI वापरकर्त्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या पतधोरण बैठकीत UPI संदर्भात मोठी घोषणा केली आहे. जर तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी सुविधा येणार आहे. या सुविधेअंतर्गत लवकरच तुम्ही UPI वापरून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, लवकरच UPI द्वारे रोख रक्कम जमा करण्यासाठी मशीनचा वापर देखील केला जाऊ शकतो. या सर्व्हिसमुळे लोकांची मोठी सोय होणार असल्याचे शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे. त्यामुळे रोख जमा करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार नाही. होय, बँक तुमच्यापासून दूर असली तरी तुम्ही UPI द्वारे रोख रक्कम जमा करता येईल.
एवढेचं नाही तर, PPI म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स कार्डधारकांना पेमेंट सुविधा देखील प्रदान करण्यात आली. या लोकांना थर्ड पार्टी UPI ॲपद्वारे UPI पेमेंट करावे लागेल.
ATM कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही
वर सांगितल्याप्रमाणे, UPI द्वारे रोख जमा करण्याची सुविधा उपलब्ध असेल, तर तुम्हाला कार्ड खिशात ठेवण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल. यामुळे ATM कार्ड ठेवण्याची, हरवण्याची समस्या दूर होईल.
‘अशा’प्रकारे करा वापर?
आतापर्यंत डेबिट कार्ड कॅश डिपॉझिट किंवा पैसे काढण्यासाठी वापरले जात होते, परंतु जेव्हा UPI ची ही सुविधा येईल तेव्हा तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे RBI लवकरच ATM मशीनवर UPI ची ही नवीन सुविधा जोडणार आहे. यानंतर, थर्ड पार्टी ऑनलाइन पेमेंट ॲप वापरून तुम्ही ATM मशीनमधून UPI द्वारे पैसे काढू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile