RBI चा मोठा निर्णय! Paytm युजर्सना आता FasTAG ते वॉलेटपर्यंत ‘या’ सेवा मिळणार नाही, वाचा सविस्तर। Tech News
भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने Paytm ला मोठा झटका दिला आहे.
Paytm Payments Bank Ltd (PPBL) वर नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी
हा नवा आदेश 29 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
31 जानेवारी 2024 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने भारतातील आघाडीची ऑनलाइन पेमेंट कंपनी Paytm ला मोठा झटका दिला आहे. RBI ने Paytm Payments Bank Ltd (PPBL) वर नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली आहे. मात्र, हा नवा आदेश जवळपास एक महिन्यानंतर म्हणजेच 29 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. होय, 29 फेब्रुवारीनंतर कोणताही नवीन ग्राहक Paytm पेमेंट बँकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. PPBL ही Paytm ची बँकिंग सेवा प्रदाता कंपनी आहे.
हे सुद्धा वाचा: Tablets on Discount: Amazon वरून स्वस्तात लोकप्रिय टॅबलेट्स खरेदी करा, मिळतायेत Best ऑफर्स
RBI ने दिली माहिती
खरं तर, RBI ने आज आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलद्वारे ही माहिती उघड केली आहे. या माहितीनुसार, 29 फेब्रुवारी 2024 नंतर, Paytm पेमेंट बँक लिमिटेड कंपनी कोणतेही नवीन ग्राहक खाते, प्रीपेड उपकरणे, वॉलेट किंवा FasTAG टॉप-अप इ. स्वीकारू शकणार नाही.
उपस्थित ग्राहकांसाठी काय बदल होणार?
RBI च्या या गाईडलाईननंतर अनेक यूजर्सना त्यांच्या Paytm अकाउंटचे काय होणार याबाबत चिंता होतेय. RBI ने आदेश दिले आहेत की, ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय Paytm बँकेतून पैसे काढू शकतात. नव्या नियमानुसार फक्त नवीन व्यवहार आणि जमावर बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही Paytm बँक खात्यात कोणताही व्यवहार करू शकणार नाही. तसेच, तुम्ही कोणतेही टॉप-अप करू शकणार नाही, ना तुम्ही गिफ्ट कार्ड पाठवू शकणार नाही किंवा तुमचे Paytm वॉलेट देखील रिडीम करू शकणार नाही.
त्याबरोबरच, तुम्ही Paytm वरून FasTAG रिचार्ज करू शकणार नाही. तुम्ही 31 जानेवारीपर्यंत तुमच्या KYC अपडेट केले नसेल, तर तुम्ही Paytm वर FasTAG वापरण्यास सक्षम असणार नाही. याव्यतिरिक्त, Paytm बँकेकडून कोणतेही EMI किंवा स्टेटमेंट पेंडिंग असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर क्लियर करून घ्या. मात्र, याचा वापर UPI पेमेंटसाठी केला जाऊ शकतो. पण, यासाठी तुमचे खाते Paytm बँकेत नसून दुसऱ्या बँकेत असणे आवश्यक आहे.
RBI च्या या निर्णयामागील कारण काय?
RBI ने Paytm पेमेंट्स बँकेवर कायदा-1949 च्या कलम 35A अंतर्गत कारवाई केली आहे, ज्याची माहिती X पोस्टद्वारे देण्यात आली आहे. Paytm पेमेंट्स बँक नियमांकडे सतत दुर्लक्ष करत होती, असे बोलले जात आहे. त्यामुळे RBI ला हे कठोर पाऊल उचलावे लागले.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile