आज प्रत्येक भारतीय नागरिक शोकात आहे, कारण भारताचा खरा रत्न म्हणजेच देशातील दिग्गज उद्योगपती ‘Ratan Tata’ यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. होय, सर्व भारतीयांचे आदर्श ‘रतन टाटा’ हे वयाच्या 86 च्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. आज संपूर्ण जग त्यांच्या विचारांचे स्मरण करत आहे. ते एक दूरदर्षी व्यक्तिमत्व होते, त्यांना तंत्रज्ञानात देखील विशेष रुची होती. प्रत्येक भारतीयांना गर्व वाटेल, तंत्रज्ञानाशी संबंधित अशी अनेक कामे आणि चर्चा त्यांनी केल्या आहेत. जाणून घेऊयात सविस्तर-
Also Read: Star Health Insurance Data Leak: 31 मिलियन ग्राहकांच्या डेटाची होतेय डील? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
काही महिन्यांपूर्वी Jio, Airtel, Vodafone ने रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. त्यामुळे अनेक युएजर्स BSNL कडे वळत आहेत. तेव्हापासून एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी सतत चर्चेत आहे. आज, BSNL कडून 5G टेस्टिंग देखील केली जात आहे. पण आपणा सर्वांनाच माहिती आहे की, रतन टाटा यांच्या कंपनीने BSNL साठी खूप मोठे योगदान दिले आहे. रतन टाटा यांच्या गुंतवणुकीनंतर BSNL आपले नेटवर्क अतिशय वेगाने विस्तारत आहे.
TATA Consultancy Service (TCS) ने अलीकडेच BSNL मध्ये 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीचे काम BSNL 4G साठी डेटा सेंटर उभारण्याचे होते. TATA-BSNL एकत्र येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे भारतातील लोकांना कमी किमतीत वेगवान इंटरनेट मिळावे, हे होय. भारतातील लोक जलद इंटरनेटसाठी खूप पैसे खर्च करतात. मात्र, हळूहळू ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. BSNL 1 हजार गावांमध्ये जलद इंटरनेट देण्याचा विचार करत आहे.
भागीदारीनंतर टाटांनी BSNL विकत घेतल्याच्या बातम्या होत्या. मात्र, खरं तर कंपनीने फक्त गुंतवणूक केली होती आणि डेटा सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला होता. आज BSNL 4G सह 5G ची देखील टेस्टिंग/ट्रायल सुरु आहे. TATA-BSNL च्या भागीदारीमुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांतीची सुरवात झाली.
खरं तर, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी AI बद्दल चर्चा केली होती, ज्याबद्दल आज सर्वत्र चर्चा होतेय. एकदा रतन टाटा म्हणाले होते की, AI आणि रोबोटिक्स कधीतरी येऊन माणसांची जागा घेऊ शकतात. टाटा समूहाच्या प्रकाशनादरम्यान त्यांनी आपले विचार मांडले. टाटा म्हणाले होते की, या प्रकारचे तंत्रज्ञान अनेक प्रकारे खूप ऍडव्हान्स आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये मानवाची गरज कमी करेल. ‘ऑटोमेशन दीर्घकाळापासून उद्योगांना चालना देत आहे, परंतु AI त्याला आणखी पुढे नेणार आहे.
रतन टाटा यांनी गेल्या 2017 मध्ये या गोष्टी सांगितल्या होत्या. या गोष्टी इन-हाउस प्रकाशनादरम्यान सांगण्यात आल्या होत्या. आता AI च्या आगमनानंतर, AI मानवाची जागा घेणार का? यावर जगभरात चर्चा केली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी रतन टाटा यांनी हे सांगून तंत्रज्ञानामधील मोठ्या क्रांतीबद्दल कल्पना दिली होती.