हा आतापर्यंतचा सर्वात छोटा कंम्प्युटर आहे, ह्याचे डायमेंशन 65x30x5mm आहे. हा कंम्प्यूटर लायनेक्स वर बेस्ड रायबियन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
छोटा कंम्प्युटर बनवणारी कंपनी रासबेरी पाय फाऊंडेशनने बाजारात आपला नवीन कंम्प्युटर रासबेरी पाय झिरो आणला आहे. कंपनीने ह्या कंम्प्युटरची किंमत 5 डॉलर (जवळपास ३२० रुपये) ठेवली आहे आणि हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त कंम्प्यूटर आहे.
हा युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेत उपलब्ध आहे. सध्यातरी, ह्याला भारतात विकण्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र आशा आहे की, लवकरच हा अधिकृत स्टोरवर उपलब्ध केला जाईल.
त्याचबरोबर हा आतापर्यंतचा सर्वात छोटा कंम्प्युटर आहे, ह्याचे डायमेंशन 65x30x5mm आहे. हा कंम्प्यूटर लायनेक्स वर बेस्ड रायबियन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्याचे प्रोसेसिंग पॉवर एवढे आहे की, हा माइनक्राफ्टसारखा अॅपसुद्धा चालवू शकतो.
ह्या कंम्प्यूटरच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, Raspberry Pi Zero मध्ये ब्रॉडकॉमच्या BCM2835 अॅप्लीकेशन प्रोसेसर आहे, ज्याला 1GHz ARM11 कोर क्लॉक स्पीड आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा चिपसेट रासबेरी पाय १ ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त गतीशील आहे. ह्यात 512MB ची रॅम आहे आणि स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसुद्धा आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात मिनी-HDMI सॉकेटसह येतो, जो 1080 पिक्सेल व्हिडियो आऊटपुटला सपोर्ट करतो. ह्यात 40 पिन GPIO हेडर आणि कम्पोजिट व्हिडियो हेडर आहे. ह्यात स्टँडर्ड USB किंवा इथरनेट पोर्ट नाही आहे. ह्याला इतर डिवाईसशी कनेक्ट करण्यासाठी अतिरिक्त हबची गरज पडेल.