बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर 'राम सेतू' या चित्रपटाला दिवाळीत जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. चित्रपट पहिल्या दिवशी 10 ते 12 कोटींची कमाई करेल असा विश्वास होता. अक्षय कुमारचे यापूर्वीचे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याचे स्टारडम आता संपत असल्याचेही बोलले जात होते. पण खिलाडी कुमारने हे सर्व अंदाज चुकीचे ठरवले आहे.
हे सुद्धा वाचा : तब्बल 29 तासांपर्यंत टिकणारे NOTHING चे नवीन पारदर्शक इअरबड्स, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये?
पहिल्या दिवसाच्या व्यवसायाचा प्रश्न आहे, तर राम सेतूने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत. राम सेतूच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन अक्षय कुमारच्या मागील अनेक चित्रपटांपेक्षा जास्त आहे. याने बच्चन पांडे (₹12.20 कोटी), सम्राट पृथ्वीराज (₹10.65 कोटी) आणि रक्षा बंधन (₹8.05 कोटी) यांचे ओपनिंग डे रेकॉर्ड तोडले.
एवढेच नाही तर 2022 मधील हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या स्टोरीपासून ते म्युझिक आणि इतर गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. काही कारणांमुळे हा चित्रपट सुरुवातीला ट्रोल झाला होता, पण रिलीज झाल्यानंतर आता त्याला जबरदस्त माउथ पब्लिसिटी मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने 15 कोटी 25 लाखांचा व्यवसाय केल्याचे सांगितले जात आहे. तरणने लिहिले – "चित्रपटाने मोठ्या प्रमाणात पॉकेट्समध्ये चांगली सुरुवात केली आहे, तर मेट्रो शहरांमध्ये फक्त सरासरी व्यवसाय केला आहे. दिवाळीनिमित्त ही मोठी सुट्टी असल्याने चित्रपटाला दमदार सुरुवात झाली आहे. मात्र, ही गती अशीच राहील का यावर शंका देखील आहे. "