चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार
चित्रपटात हुंडा घेण्याच्या दुष्ट प्रथेबाबत सत्य दर्शवण्यात आले आहे.
बॉलीवूडदमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षा बंधन; या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाची रिलीज डेट खूप आधीच जाहीर झाली असून आता चित्रपटाच्या कथेचाही अंदाज मोठ्या प्रमाणात आला आहे. आता अखेर रक्षाबंधन या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे.
हा चित्रपट अगदी मनोरंजनाने परिपूर्ण आहे, हे ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच समजून येते. अक्षयने आपल्या चित्रपटांमध्ये उघड्यावर शौचास विरोध आणि पॅडमॅन बनून महिलांच्या व्यथा मांडणारा एक सामान्य माणूस अशा भूमिका केल्यानंतर, आता चार बहिणींच्या लग्नाचा भार असलेल्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यांच्या लग्नात त्याला भरपूर हुंडा द्यायचा आहे.
चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षयवर प्रेम करणाऱ्या भूमी पेडणेकरच्या वडिलांची इच्छा आहे की, त्याने सहा महिन्यात भूमीशी लग्न करावे अन्यथा ते आपल्या मुलीचे लग्न दुसरीकडे करून देतील. अशाप्रकारे, अक्षयला सहा महिन्यांच्या आत त्याच्या बहिणींचे लग्न करायचे आहे, जेणेकरून त्याला भूमीशी लवकरात लवकर लग्न करता येईल. अक्षय कुमारच्या या चित्रपटात समाजाच्या हसत हसत हुंडा घेण्याच्या दुष्ट प्रथेबाबत सत्य दर्शवण्यात आले आहे.
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर अभिनित या चित्रपटात सादिया खतीब, सहजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे, तसेच कलाकारांचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.