Rakshabandhan 2024: ‘या’ रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या खास गिफ्ट्स! कमी किमतीत भारी प्रोडक्ट्स उपलब्ध 

Rakshabandhan 2024: ‘या’ रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या खास गिफ्ट्स! कमी किमतीत भारी प्रोडक्ट्स उपलब्ध 
HIGHLIGHTS

रक्षाबंधनाच्या सणाला तुमच्या बहिणीला द्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स

आजकाल कामासाठी तसेच लुक स्टाईल करण्यासाठी गॅजेट्सचा वापर केला जातो.

गिफ्ट ऑप्शन म्हणून Amazon वर कमी किमतीत अनेक गॅजेट्स उपलब्ध आहेत.

Rakshabandhan 2024 बहीण भावांच्या नात्यातील प्रेमाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बहिणीला अनेक जबरदस्त आणि महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट गिफ्ट करू शकता. आजकाल कामासाठी तसेच लुक स्टाईल करण्यासाठी गॅजेट्सचा वापर केला जातो. त्यामुळे, तुम्ही देखील तुमच्या बहिणीला असे गॅजेट्स गिफ्ट करू शकता, जे तिच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी खूप उपयुक्त ठरेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही निवडक उपकरणांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला गिफ्ट म्हणून खरेदी करता येतील.

Noise Diva Smartwatch

Noise Diva त्याची किंमत 2,999 रुपये आहे. हे घड्याळ Amazon वरून 145 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचमध्ये डायमंड कट डायल मिळेल. या स्मार्टवॉचबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 1.1 AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक वॉच फेसेस देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, यात फिमेल सायकल ट्रॅकर देखील उपलब्ध आहे. ही वॉच रोझ गोल्ड कलर ऑप्शनमध्ये देखील येते. ही वॉच ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह सज्ज आहे. येथून खरेदी करा

rakshabandhan 2024 gift ideas

OnePlus Nord Buds 2

OnePlus Nord Buds 2 ची किंमत 2,999 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही स्मार्टवॉच 145 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. या मध्ये 25db ANC वैशिष्ट्य आहे. इयरबड्स 12.4mm डायनॅमिक ड्रायव्हर्ससह येतात. एका चार्जवर, ते 36 तासांपर्यंत संगीत प्लेबॅक देते. या TWS ला 4 mics आणि IP55 रेटिंग आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

JBL Go 3

JBL Go 3 हा पोर्टेबल स्पीकर Amazon वरून 121 रुपयांना खरेदी करता येईल. हा स्पीकर Amazon वर 2,499 रुपयांच्या किमतीसह सूचिबद्ध आहे. या सर्व प्रोडक्ट्सवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या स्पीकरला धूळ आणि पाणी प्रतिरोधकासाठी IP67 रेटिंग मिळाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्पीकर पूर्ण चार्ज होण्यासाठी 2.5 तास लागतात. एकदा स्पीकर पूर्णपणे चार्ज झाला की, तो 5 तास चालतो. Buy From Here

Redmi A3x could launch in India soon: Specs surface online
Redmi A3

Redmi A3

या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या बहिणीला एखादा स्मार्टफोन देखील गिफ्ट करू शकता. Redmi A3 फोनचे 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 6,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या फोनमध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय, हा फोन MediaTek Helio G36 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यासोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo