बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' या चित्रपटाची कामगिरी दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे आणि आतापर्यंत तो 50 कोटींचा व्यवसायही करू शकलेला नाही. बुधवारी आलेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने सात दिवसांत आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे आणि तो फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.
हे सुद्धा वाचा : Airtel ने 4G रिचार्ज प्लॅन आणला असून मिळेल अमर्यादित कॉलिंगसह दररोज 1.5GB डेटा
या चित्रपटाचा परफॉर्मन्स पाहता लवकरच अक्षयचा 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटांप्रमाणे बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फ्लॉप होणार, असे दिसते. मात्र, आठवड्याभराच्या कमाईच्या बाबतीत 'बच्चन पांडे'ने 'रक्षा बंधन'ला मागे टाकले आहे.
अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'मधून चाहत्यांना अपेक्षा होती की, कदाचित बहीण-भावाच्या प्रेमावर आधारित चित्रपट चांगला चालेल. मात्र, असे काहीही झाले नाही आणि आता हा चित्रपट 50 कोटींचा आकडा पार करणेही थोडे कठीण वाटते. चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.2 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.4 कोटी, तिसऱ्या दिवशी 6.51 कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊन 7.05 कोटींची कमाई केली. पण यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण सुरू झाली आणि पाचव्या दिवशी 6.31 कोटी आणि सहाव्या दिवशी 2.11 कोटी कमावले. त्याचवेळी, आता सातव्या दिवशी केवळ 1.70 कोटींचा व्यवसाय झाला आहे.
आनंद एल राय दिग्दर्शित, 70 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'रक्षा बंधन'ने आता एकूण 38.28 कोटींचा आकडा पार केला आहे. त्याचवेळी या वर्षी रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' या चित्रपटाने 'रक्षा बंधन' वर बाजी मारली आहे. 'बच्चन पांडे'ने पहिल्या दिवशी 13.21 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर एका आठवड्यात 47.98 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र अक्षयचा 'रक्षा बंधन' चित्रपट फ्लॉप होण्याचा मार्गावर दिसत आहे.